लग्नाच्या दोन ते तीन महिने आधीपासून कपडे खरेदीला सुरुवात केली जाते. लग्नात नेसायच्या साड्या, रिसेप्शन लेहेंगा इत्यादी अनेक गोष्टींची खरेदी केली जाते. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये मुली कायमच शालू किंवा बनारसी साडी नेसण्यास जास्त प्राधान्य देतात. पण साडी नेसण्याऐवजी तुम्ही इंडो-वेस्टर्न लेहेंगा परिधान करू शकता. हल्ली इंडो-वेस्टर्न लेहेंग्याची मोठी क्रेझ आहे. इंडो-वेस्टर्न लेहेंग्यावर डायमंड आणि मिनाकारी दागिने परिधान केले जाते. आज आम्ही तुम्हाला लग्नातील रिसेप्शनमध्ये घालण्यासाठी काही इंडो-वेस्टर्न लेहेंग्याच्या डिझाईन सांगणार आहोत. या डिझाईनचे लेहेंगे तुमच्यावर अतिशय सुंदर दिसतील. (फोटो सौजन्य – pinterest)
लग्नातील रिसेप्शनमध्ये ग्लॅमर लुकसाठी परिधान Indo-Western Lehenga

लग्नात जॅकेट स्टाईल लेहेंगा परिधान केल्यास उठावदार आणि स्टायलिश लुक दिसेल. जॅकेट स्टाईल लेहेंग्यावर केलेले बारीक बारीक मण्यांचे नक्षीकाम लुकची शोभा वाढवेल.

रिसेप्शनमध्ये तुम्ही भरतकाम केलेला सुंदर स्कर्ट आणि त्यावर टीशर्ट किंवा टॉप घालून सुंदर लुक स्टाईल करू शकता. यामुळे तुमचा लुक स्टायलिश दिसेल.

फ्लेअर्ड पलाझो क्रॉप टॉप किंवा शॉर्ट कुर्ता असलेल्या लेहेंग्याची सोशल मीडियावर मोठी क्रेझ आहे. या डिझाईनची लेहेंगा तुम्ही हळदी सोहळ्यात सुद्धा घालू शकता.

काहींना लग्नात स्टायलिश आणि रॉयल लुक हवा असतो. या लुकसाठी भरीव नक्षीकाम आणि वेगवेगळ्या मण्यांचा वापर केला जातो.

बनारसी साडी किंवा शॉफन फॅब्रिकचा लेहेंगा तुमच्या सौंदर्यात भर पडेल. यावर मोत्याचे किंवा सोन्याचे दागिने अतिशय सुंदर दिसतात.






