वंदे मातरम या राष्ट्रीय गीत गायनाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. यानिमित्त देशभरात सर्व शाळांमध्ये वंदे मातरम् गायन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या सक्ती विरोधात भिवंडी पूर्वेचे समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी शासनास पत्र देऊन विरोध केला होता. रईस शेख यांनी यामाध्यमातून वंदे मातरम् या गीताचा अपमान केला. त्याचा भिवंडीत हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध नोंदवला जात आहे. या निषेध आंदोलनात भाजपा शहराध्यक्ष रवी सावंत, भाजपा पदाधिकारी ,सकल हिंदू समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.