फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. ते आत्म्याचे प्रतिनिधित्व करतात. यावेळी सूर्य 16 नोव्हेंबर रोजी आपली राशी बदलणार आहे. मंगळ वृश्चिक राशीत, म्हणजेच मंगळाच्या राशीत प्रवेश करेल. सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करतो त्यावेळी वृश्चिक संक्रांती साजरी केली जाते. वृश्चिक राशीत सूर्य ग्रहांचा राजा बुध याच्याशी युती करेल. 24 ऑक्टोबरपासून बुध या राशीत आहे.
या दोन्ही ग्रहांच्या एकत्र येण्यामुळे बुधादित्य योग तयार होणार आहे. हा योग खूप शुभ मानला जातो. बुधादित्य योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
मिथुन राशीसाठी ही युती खूप शुभ ठरणार आहे. यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्नात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळू शकते आणि त्यांना पदोन्नती देखील मिळू शकते. जुने वाद मिटतील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना यश मिळेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी ही युती फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्ही नवीन उपक्रमाची सुरुवात करु शकता. ज्यामुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. त्यांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता. तुम्ही प्रलंबित न्यायालयीन खटले जिंकाल. तुमची संपत्ती वाढू शकते.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला राहील. यावेळी तुमच्या पगारामध्ये अपेक्षित वाढ होईल. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. तसेच कर्जातून सुटका होईल. परदेशात नोकरी शक्य आहे. या काळात कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला परदेशात नोकरी मिळू शकते.
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहणार आहे. या युतीमुळे धनु राशीच्या लोकांच्या अनेक समस्या दूर होतील. संपत्तीमध्ये वाढ होईल. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. या युतीमुळे तुमच्या अनेक समस्या दूर होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. अडकलेले पैसे परत मिळतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: सूर्य आणि बुधाची युती 16 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
Ans: सूर्य आणि बुधाची युतीचा मिथुन, कन्या, धनु राशीच्या लोकांना फायदा होणार
Ans: सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होतो






