फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मात एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष प्रार्थना केल्याने शुभ फळे मिळतात. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला भगवान विष्णूसाठी उत्पन्न एकादशीचे व्रत पाळले जाणार हे व्रत आज शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी आहे. एकादशीच्या दिवशी उपवास करुन भगवान विष्णू आणि लक्ष्मीची विधिवत पूजा झाल्यानंतर राशीनुसार काही गोष्टींचे दान करणे फायदेशीर ठरते. उत्पन्न एकादशीला राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे, जाणून घ्या
उत्पन्न एकादशीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांना लाल फुले अर्पण करावे त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील.
उत्पन्न एकादशीला पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. त्यामुळे व्यक्तीच्या सुख समृद्धीमध्ये वाढ होईल.
मिथुन राशीच्या लोकांनी उत्प्न्न एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना हिरव्या कपड्यांचे दान करावे त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील.
कर्क राशीच्या लोकांनी उत्प्न्न एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तांदळाची खीर अर्पण करावी. त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
सिंह राशीच्या लोकांना उत्प्न्न एकादशीच्या दिवशी पिवळ्या कपड्यांचे दान करावे त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात.
कन्या राशीच्या लोकांना आर्थिक अडचणी येत असल्यास पांढऱ्या मिठाईसोबत केशर अर्पण करा. यामुळे घरामध्ये शांती आणि आनंदाचे वातावरण राहील.
तूळ राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा. यामुळे वैवाहिक जीवन चांगले राहील आणि सुख समृद्धी वाढेल.
वृश्चिक राशीच्या लोकांनी उत्पन्न एकादशीच्या दिवशी नोकरीत किंवा व्यवसायात प्रगती होण्यासाठी गुळाचे दान करावे. यामुळे तुम्हाला भगवान नारायणाचा आशीर्वाद मिळेल.
धनु राशीच्या लोकांना भगवान विष्णूंच्या आशीर्वादामुळे पिवळे कपडे, पिवळे चंदन आणि पिवळी फळे यांचे दान करावे.
मकर राशीच्या लोकांनी उत्पन्न एकादशीच्या दिवशी दही आणि वेलचीचा नैवेद्य दाखवा. त्यामुळे तुमच्यावर कायम भगवान विष्णूंचा आशीर्वाद राहील.
कुंभ राशीच्या लोकांना उत्पन्न एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील.
मीन राशीच्या लोकांनी उत्पन्न एकादशीच्या दिवशी गरिबांची सेवा करा, दान करा आणि देवाला साखरेचा नैवेद्य दाखवा
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: उत्पन्न एकादशी शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी आहे
Ans: उत्पन्न एकादशीला राशीनुसार विविध वस्तूंचे दान करावे
Ans: उत्पन्न एकादशीचा दिवस भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे






