फोटो सौजन्य- pinterest
त्रयोदशी तिथीला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की, महादेव आणि पार्वतीची पूजा केल्यास सर्व प्रकारचे आजार दूर होतात. जीवनात सुख आणि समृद्धी येते. ज्यावेळी ही तिथी सोमवारी येते त्यावेळी या व्रताला सोम प्रदोष व्रत असे म्हटले जाते. नोव्हेंबर महिन्यातील पहिले सोम प्रदोष व्रत सोमवार, 3 नोव्हेंबर रोजी आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या
सोम प्रदोष व्रताची सुरुवात सोमवार 3 नोव्हेंबरपासून होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कार्तिक शुक्ल त्रयोदशी तिथीची सुरुवात देखील 3 नोव्हेंबर सकाळी 5:07 वाजता होईल आणि कार्तिक शुक्ल त्रयोदशी तिथीची समाप्ती 4 नोव्हेंबर रोजी पहाटे 2:05 वाजता होईल. प्रदोष व्रत पूजा प्रदोष काळात केली जाते म्हणजे संध्याकाळच्या वेळी ही पूजा केली जाते. त्रयोदशी तिथी प्रदोष काळ सोमवार, 3 नोव्हेंबर रोजी आहे.
प्रदोष व्रतामध्ये सूर्यास्तानंतर आणि रात्री होण्यापूर्वी महादेवाची पूजा केली जाते, या काळाला प्रदोष काळ म्हणतात. या काळात पूजा केल्याने सर्वोत्तम फळ मिळते. प्रदोष काळात पूजेसाठी शुभ मुहू्र्त संध्याकाळी 5.34 ते 8.11 वाजेपर्यंत असेल. एकूण कालावधी 2 तास 36 मिनिटे राहील.
प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व आवरुन आंघोळ झाल्यानंतर चांगले कपडे परिधान करावे. त्यानंतर ॐ नमः शिवाय या मंत्रांचा जप करुन उपवास करावा. दिवसभर महादेवाचे स्मरण करावे. प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा स्नान करा. भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या मूर्ती किंवा शिवलिंग पूजेसाठी स्वच्छ ठिकाणी ठेवा. त्यानंतर, प्रथम गंगाजल, दूध, दही, मध, तूप आणि उसाचा रस वापरून शिवलिंगावर रुद्राभिषेक करा. भगवान शिवाला चंदनाचा लेप लावा आणि त्यांना बेलाची पाने, भांग, धतूरा, आक फुले आणि शमीची पाने अर्पण करा.
देवी पार्वतीला सोळा श्रृंगार अर्पण करा. हंगामी फळे, मिठाई आणि खीर अर्पण करा. आसनावर बसून रुद्राक्ष माळेचा वापर करून “ॐ नमः शिवाय” हा मंत्र किमान 108 वेळा उच्चार करा. त्यानंतर सोम प्रदोष व्रताची कथा वाचा किंवा ऐका. त्यानंतर महादेवांची आरती करावी. पूजा झाल्यानंतर सर्वामध्ये हा प्रसाद वाटावा.
सोमवारचा दिवस महादेव आणि चंद्र या दोघांनाही समर्पित आहे. सोम प्रदोष व्रत केल्याने चंद्राच्या त्रासांपासून मुक्तता मिळते आणि आरोग्य चांगले राहते. दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी हे व्रत करणे खूप फायदेशीर ठरते.
या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्यास महादेव आणि पार्वती लवकर प्रसन्न होतात. तसेच भक्तांच्या मनातील सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात.
प्रदोष व्रताचे योग्यरित्या पालन केल्यास घरात शांती आणि आनंद येतो आणि वैवाहिक जीवन सुसंवादी राहते. अविवाहित मुलीनी हे व्रत करणे फायदेशीर असल्याचे मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






