नव्या वर्षावर मंगळाचे सावट
२०२५ सालाबद्दल अनेक भाकिते करण्यात आली होती. यामध्ये बाबा वांगा, नोस्ट्राडेमस आणि ग्रह आणि तारे मोजणारे सध्याचे ज्योतिषी यांचा समावेश आहे. यातील अनेक भाकिते मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विनाशाशी संबंधित आहेत. नवीन वर्ष सुरू होऊन फक्त २० दिवस उलटले आहेत आणि आतापर्यंत देशात आणि जगात घडलेल्या अपघात, दुर्घटना आणि विनाशामुळे संपूर्ण वर्षभर चिंता निर्माण झाली आहे की जर हे भाकीत खरे ठरले तर जगात विनाश होईल.
वर्षाची सुरूवात झाल्यापासूनच अनेक दुर्घटना घडून येताना दिसून येत आहेत आणि आता खरंच प्रलयही होणार का अशी चिंता लोकांना सतावू लागली आहे. २०२५ हे मंगळ ग्रहाचे वर्ष मानले जाते आणि मंगळ हा अग्निशी संबंधित ग्रह असून त्याचा काय परिणाम होत आहे ते आपण जाणून घेऊया. ज्योतिषी समीर मणेरीकर यांनी मंगळाचा संबंध स्पष्ट करून सांगितलाय (फोटो सौजन्य – iStock)
आगीचे विराट रूप
सध्या लॉस एंजेलिसमधील भीषण आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे आणि अनेक मृत्यू झाले आहेत. त्याचवेळी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात आग लागली. सुदैवाने आणि तत्परतेमुळे, वेळेत नियंत्रण मिळवण्यात आले आणि मोठे नुकसान टळले परंतु या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण जग हादरले आहे हे मात्र नक्की. लॉस एंजेलिसमधील आग तर अत्यंत भयावह होती आणि त्यामुळे अनेक जणांची घरेही जळली आहेत. नवे वर्ष सुरू होऊन केवळ २० दिवसच उलटले आहेत. त्यामुळे आता सगळ्यांची चिंता अजून वाढली आहे.
यावर्षीचा राजा मंगळ
ज्योतिषशास्त्रानुसार, २०२५ सालचा राजा मंगळ आहे. एप्रिलपासून, उर्वरित वर्षासाठी सूर्य राजा असेल. मंगळ ग्रहावर अग्नि तत्वाचे वर्चस्व आहे. म्हणूनच मंगळाला अंगारक आणि भौम असेही म्हणतात. तसेच, लाल रंगाचा मंगळदेखील क्रूर ग्रह मानला जातो. मंगळाच्या स्थितीमुळे देशात आणि जगात आग, भूकंप, हिंसाचार यासारखे अपघात होतात. त्यामुळे यावर्षी कोणत्याही लाल रंगाचे कपडे परिधान करू नयेत असंही सांगण्यात आलं आहे.
मंगळ होणार वक्री
सध्या मंगळ कर्क राशीत आहे आणि २१ जानेवारी २०२५ पासून तो वक्री होणार आहे. यामुळे, मंगळ कर्क राशीपासून मागे सरकेल आणि मिथुन राशीत प्रवेश करेल. ज्योतिषांच्या मते, मंगळाची वक्री गती काही राशीच्या लोकांच्या समस्या वाढवू शकते.
त्याचवेळी मंगळ वक्री झाल्यामुळे देशात आणि जगात राजकीय, आर्थिक बदल आणि अपघात असे अनेक बदल होऊ शकतात. अर्थात, २० जानेवारी रोजी ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर संपूर्ण जगात अनेक मोठे बदल होतील कारण ट्रम्प यांनी त्याबाबत आधीच घोषणा केल्या आहेत.
गुरुच्या राशीत तयार होणार त्रिग्रही योग, या राशीचे बदलणार नशीब
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही