दह्यासोबत खाल्लेले 'हे' पदार्थ आतड्यांसाठी ठरतात विष! रोजच्या आहारात चुकूनही करू नका
दह्यासोबत कोणते पदार्थ खाऊ नये?
चुकीचे फूड कॉम्बिनेशन असलेले पदार्थ?
दही खाण्याचे फायदे?
रोजच्या आहारात दूध, दही, पनीर इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे कायमच सेवन केले जाते. त्यातील सगळ्यांचं आवडणारा पदार्थ म्हणजे दही. थंडगार दही खाल्ल्यानंतर पोटात वाढलेली उष्णता शांत होते आणि आराम मिळतो. दह्याच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टरीयांचे प्रमाण वाढते आणि आरोग्य सुधारते. दुपारच्या जेवणात वाटीभर दह्याचे नियमित सेवन केल्यास शरीर हायड्रेट राहील आणि शरीरात वाढलेली उष्णता कमी होईल. पण अन्नपदार्थ चुकीच्या पदार्थांसोबत खाल्ल्यास शरीराची पचनक्रिया बिघडून जाते. यामुळे शरीरातील ‘पाचन अग्नी’ मंदावतो आणि खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाहीत. यामुळे शरीरात विषारी घटक तयार होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दह्यासोबत कोणत्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चुकीचे फूड कॉम्बिनेशन खाल्ल्यास आतड्यांमध्ये विषारी घटक तयार होतील आणि शरीराला हानी पोहचेल.(फोटो सौजन्य – istock)
आपल्यातील अनेकांना केळी आणि वेगवेगळी इतर आंबट फळे दह्यात मिक्स करून खाण्याची सवय असते. पण असे करू नये. दह्यासोबत केळी किंवा इतर आंबट फळे खाल्ल्यास पचनक्रिया बिघडण्याची खूप जास्त शक्यता असते. केळी हे फळ लवकर पचन होत नाही. तर पोहे पचनासाठी अतिशय हलके असतात. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे पचनाचा वेग पूर्णपणे वेगळा होऊन जातो. यामुळे ऍसिडिटी, अपचन, जळजळ किंवा आतड्यांसंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. चुकीच्या अन्नपदार्थांचे एकत्र सेवन केल्यामुळे पोटात गॅस, जडपणा किंवा सुस्ती जाणवू लागते.
सकाळच्या नाश्त्यात राजमा आणि इतर वेगवेगळ्या धान्यांपासून बनवलेले सॅलड खाल्लेले जातात. तसेच काहींना जिमवरून जाऊन आल्यानंतर दही खाण्याची सवय असते. त्यामुळे दही आणि सॅलड एकत्र खाल्ल्यामुळे पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. दही आंबवलेला पदार्थ आहे. दही आणि राजमा खाल्ल्यामुळे ‘आम’ दोष वाढतो. यामुळे ॲसिडिटी, पोटदुखी आणि गॅसची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे राजमा खाल्ल्यानंतर ४ ते ५ तास दही खाऊ नये.
जेवणासोबत सगळ्यांचं काकडी किंवा इतर सॅलड असलेल्या कच्च्या भाज्यांचे सेवन करायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. कच्ची काकडी थंड असते आणि दालखिचडी पचनासाठी अतिशय जड असते. त्यामुळे काकडी आणि दालखिचडी इत्यादी पदार्थांचे एकत्र सेवन अजिबात करू नये. खिचडीसोबत काकडी खायची असल्यास काहीवेळ काकडी बाहेर काढून ठेवावी. यामुळे पचनक्रियेत अडथळे निर्माण होत नाहीत.






