फोटो सौजन्य- pinterest
शुक्रवार, 17 ऑक्टोबर रोजी रमा एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूंसोबत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. रमाचा अर्थ लक्ष्मीशी संबंधित आहे. यासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी याची पूजा केल्याने भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आर्थिक लाभ देखील होतो. दरम्यान या तिथीच्या वेळी काही गोष्टींचे दान करताना नकळत चुका होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार राशीनुसार काही गोष्टींचे दान करणे फायदेशीर मानले जाते. याच्या प्रभावामुळे विष्णूंचा आशीर्वाद सर्व राशीच्या लोकांवर राहतो आणि कुंडलीमधील असलेल्या ग्रह दोषांचा अशुभ प्रभाव कमी होण्यास मदत होते. रमा एकादशीच्या दिवशी राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे, जाणून घ्या
पंचांगानुसार, कार्तिक कृष्ण पक्षाची एकादशी तिथीची सुरुवात 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.35 वाजता झाली आहे आणि या तिथीची समाप्ती 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.12 मिनिटांनी होणार आहे. उद्यतिथीनुसार हे व्रत 17 ऑक्टोबर रोजी पाळले जाणार आहे.
मेष राशीच्या लोकांनी रमा एकादशीच्या दिवशी लाल रंगांच्या वस्त्राचे दान करावे. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते, असे म्हटले जाते.
वृषभ राशीच्या लोकांनी रमा एकादशीच्या दिवशी चांदी आणि पांढऱ्या गोष्टींचे दान करावे. यामुले देवी लक्ष्मी प्रसन्न होते. त्यासोबतच कुंडलीमधील शुक्राची स्थिती देखील मजबूत होते.
मिथुन राशीच्या लोकांनी रमा एकादशीच्या दिवशी हिरव्या गोष्टींचे दान करावे. या गोष्टींचे दान करणे खूप फायदेशीर मानले जाते.
कर्क राशीच्या लोकांनी एकादशीच्या लोकांनी अन्नवस्त्राचे दान करावे. यामुळे तुमची रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होण्यास मदत होईल.
सिंह राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी पैसे किंवा वस्त्र यांचे दान करायला हवे. यामुळे नशिबाची साथ लाभते त्यासोबतच भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील आपल्यावर राहतो.
कन्या राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान करावे. यावेळी तुम्ही फळांचे देखील दान करु शकता. यामुळे भगवान विष्णू्ंचा आशीर्वाद देखील तुमच्यावर राहू शकतो.
तूळ राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी दूध आणि दही यांचे दान करावे. यामुळे व्यक्तीच्या कुंडलीमधील शुक्राची स्थिती मजबूत होण्यास मदत होते.
वृश्चिक राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी नोकरी आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी गुळाचे दान करणे फायदेशीर ठरेल. असे केल्याने तुमच्यावर भगवान विष्णूंची कृपा राहू शकते.
धनु राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगांचे कपडे, केळ आणि बेसन आणि चणा डाळींचे दान करावे. यामुळे भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळतो.
मकर राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी काळ्या रंगांचे कंबल दान करावे. यामुळे भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळतो.
कुंभ राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी उडीद डाळ, काळे तीळ आणि काळ्या रंगांच्या कपड्यांचे दान करावे. तसेच मंदिरामध्ये झाडूचे देखील दान करु शकते.
मीन राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी पिवळे फूल पूजेसाठी दान करावे. त्यासोबतच पिवळ्या रंगांचे कपडे, केळ आणि बेसन अर्पण करावे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)