फोटो सौजन्य- pinterest
दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी येते यावेळी येणाऱ्या चतुर्थी तिथीला विघ्नराज संकष्टी चतुर्थी म्हणतात. असे म्हटले जाते की, जो भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची मनोभावे पूजा करतो त्या व्यक्तीला जीवनामध्ये संतती, आरोग्य लाभ आणि आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते. सप्टेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी यावेळी बुधवार, 10 सप्टेंबर रोजी आहे. यावेळी काही शुभ योग देखील तयार होत आहे आणि त्याचे महत्त्व देखील जाणून घेऊया
संकष्टी चतुर्थीच्या तिथीची सुरुवात बुधवार, 10 सप्टेंबर रोजी दुपारी 3.37 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती गुरुवार, 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12.45 वाजता होईल. या दिवशी पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 6.4 ते 9.11 वाजेपर्यंत असेल तर संध्याकाळच्या पूजेचा मुहूर्त दुपारी 4.58 ते 6.32 वाजेपर्यंत असेल. या दिवशी चंद्रोद्य रात्री 8 वाजून 6 मिनिटांनी असेल.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यानंतर देव्हारा स्वच्छ करुन घेऊन गणपती बाप्पाची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करावी. त्यानंतर जलाभिषेक करावा. नंतर पिवळे चंदन लावून त्यावर फुले, फळे इत्यादी अर्पण करा. नंतर गणपती बाप्पाला बेसनाचा लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा. सर्वांत शेवटी संकष्टी चतुर्थीची कथा ऐकावी किंवा वाचावी त्यानंतर बाप्पाची आरती करुन घ्यावी. नंतर नैवेद्य दाखवून उपवास सोडावा.
धार्मिक मान्यतेनुसार, विघ्नराज संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने संततीचा जन्म, चांगले आरोग्य आणि आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते, अशी मान्यता आहे. तसेच कुटुंबामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते. असे म्हटले जाते की, या दिवशी जो व्यक्ती मनोभावे बाप्पाची पूजा करतो त्या व्यक्तीला जीवनात यश मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.
अश्विन महिन्यातील विघ्नराज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वा आणि सिंदूर अर्पण करावे. यासोबतच 21 दुर्वा अर्पण करुन मंत्रांचा जप करावा. असे केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होण्यास मदत होते.
संकष्ट म्हणजे दुःख किंवा त्रास. संकष्टी चतुर्थीला उपवास केल्याने सर्व संकटांपासून मुक्तता मिळते, असे म्हटले जाते. या दिवशी व्रत पाळले जाते. मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या दुःखांपासून मुक्ततेसाठी देवाकडे प्रार्थना करतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)