फोटो सौजन्य- pinterest
वैदिक पंचांगानुसार, पितृपक्षाची सुरुवात अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदा तिथीला होते आणि ही तिथी अमावस्या तिथीला संपते. धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षात पूर्वज पृथ्वीवर राहतात. या काळात लोक त्यांच्या पूर्वजांसाठी तर्पण, श्राद्ध कर्म आणि पिंडदान करतात.
असे मानले जाते की, असे केल्याने व्यक्तीला जीवनामध्ये पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार, पूर्वजांचे फोटो चुकीच्या दिशेने लावल्यास जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात. तसेच पूर्वजांना राग देखील येऊ शकतात. कोणत्या दिशेला लावावा पूर्वजांचा फोटो, जाणून घ्या.
पंचांगानुसार, रविवार 7 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरु होत आहे आणि रविवार, 21 सप्टेंबर रोजी पितृपक्षाची समाप्ती सर्वपित्री अमावस्येला होणार आहे. दुसऱ्या दिवशी सोमवार, 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होईल.
वास्तुशास्त्रानुसार, बेडरूम आणि स्वयंपाकघरात कधीही पूर्वजांचे फोटो लावू नयेत. असे मानले जाते की या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावल्याने त्यांना राग येऊ शकतो आणि व्यक्तीच्या जीवनात अनेक अडथळे येऊ शकतात. यामुळे कधीही या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावू नये.
वास्तुशास्त्रानुसार, पितृपक्षात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा सर्वोत्तम मानली जाते. कारण ही दिशा पूर्वजांची दिशा मानली जाते. असे मानले जाते की, या दिशेला पूर्वजांचे फोटो लावल्याने पूर्वजांचा आशीर्वाद कुटुंबातील सदस्यांवर राहतो आणि जीवनातील दुःख आणि संकटे दूर होतात आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. जीवनात शुभ फल प्राप्त होतात.
वास्तुशास्त्रानुसार, बैठकीच्या खोलीत, बेडरूममध्ये आणि देव्हाऱ्याच्या बाजूला पूर्वजांचे फोटो लावू नका. या ठिकाणी फोटो लावल्यास कुटुंबातील समस्या वाढतात.
कधीही मृत पूर्वजांचे फोटो जिवंत व्यक्तीसोबत लावू नका. जिवंत व्यक्तीसोबत लावू नये. त्यासोबतच पूर्वजांचे एकापेक्षा जास्त फोटो लावणे टाळावे. असे केल्यास व्यक्तीचा त्याच्या जीवनावर वाईट प्रभाव पडतो.
अनेकवेळा असे होते की, आपण आपल्या पूर्वजांचे फोटो लावताना एकाच पूर्वजाचे अनेक फोटो घरात वेगवेगळ्या ठिकाणी लावतो. एकाच पूर्वजाचे एकापेक्षा जास्त फोटो लावू नयेत. असे म्हटले जाते की, असे केल्याने पूर्वज नाराज होतात आणि घरामध्ये कलह निर्माण होतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)