(फोटो सौजन्य: Pinterest)
हिंदू धर्मात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्रीची सुरुवात होते. भारतामध्ये शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान आहे. या काळामध्ये यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबरपासून होत आहे. यामध्ये दरवर्षी एकूण 4 नवरात्री येतात. त्यापैकी दोन गुप्त नवरात्र असतात तर दोन शारदीय नवरात्र असतात. त्यातील एक शारदीय नवरात्र ती अश्विन महिन्यात साजरी केली जाते. मात्र चैत्र आणि अश्विन महिन्यामध्ये येणारी नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या काळामध्ये देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.
Gajakesari Raj Yoga: 12 वर्षानंतर पितृपक्षात लागणार गजकेसरी राजयोग, या राशीची लोक होणार मालामाल
आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाातील प्रतिपदा तिथीची सुरुवात 22 सप्टेंबर रोजी पहाटे 1.23 वाजता होणार आहे या तिथीची समाप्ती 23 सप्टेंबर रोजी पहाटे 2.55 वाजेता होईल. शारदीय नवरात्रीला घटस्थाापनेसाठी मुहूर्त आणि महत्त्व काय आहे जाणून घ्या.
शारदीय नवरात्रीच्या दिवशी घटस्थापनेसाठी मुहूर्त
नवरात्रीमध्ये घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त सकाळी 6.9 ते 8.6 वाजेपर्यंत असेल. या शुभ मुहूर्तात घटस्थापना करता येते. याशिवाय अभिजित मुहूर्ताचा काळ सकाळी 11.49 ते दुपारी 12.38 पर्यंत राहील.
नवरात्रीची पूजा करण्याची पद्धत
सर्वप्रथम देव्हारा स्वच्छ करुन घ्यावा. त्यानंतर चौरंग स्वच्छ करुन घ्यावा त्यावर मातीच्या भांड्यात माती भरुन त्यात बार्ली किंवा गहू बियाणे पेरा. त्यानंतर एका कलशामध्ये गंगाजल, सुपारी, हळद, नाणे आणि तांदूळ घेऊन कलशावर आंबा किंवा अशोकाची पाने ठेवा आणि वर लाल कापडात गुंडाळलेला नारळ ठेवा. यानंतर मंत्रांचा जप करून कलशाची स्थापना करावी. त्यानंतर प्रार्थना करावी.
कलश स्थापना करुन झाल्यानंतर नऊ दिवस दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करावी. कलशाजवळ तुपाचा दिवा लावून सकाळ संध्याकाळी आरती करावी. त्यासोबतच दुर्गा सप्तशती किंवा दुर्गा चालिसाचे पठण करावे. नवरात्रीत नऊ दिवस अखंड ज्योती प्रज्वलित करणे देखील शुभ मानले जाते.
देवीची नऊ रुपे कोणती आहेत आणि कोणत्या दिवशी कोणत्या रूपाची पूजा करायची
सोमवार, 22 सप्टेंबर – प्रतिपदा, देवी शैलपुत्रीची पूजा
मंगळवार, 23 सप्टेंबर – द्वितीया, देवी ब्रह्मचारिणी पूजा
बुधवार, 24 सप्टेंबर – तृतीया, देवी चंद्रघंटा पूजा
गुरुवार, 25 सप्टेंबर – तृतीया
शुक्रवार, 26 सप्टेंबर – चतुर्थी, देवी कूष्मांडा पूजा
शनिवार, 27 सप्टेंबर – पंचमी, देवी स्कंदमाता पूजा
रविावर, 28 सप्टेंबर – षष्ठी, देवी कात्यायनी पूजा
सोमवार, 29 सप्टेंबर – सप्तमी, देवी कालरात्रि पूजा
मंगळवार, 30 सप्टेंबर – महाअष्टमी, देवी महागौरी पूजा
बुधवार, 1 ऑक्टोबर – महानवमी, देवी सिद्धिदात्री पूजा
गुरुवार, 2 ऑक्टोबर – दसरा
शारदीय नवरात्रीचे महत्त्व
नवरात्रीचा हा उत्सव असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. या काळात भाविक नऊ दिवस उपवास करतात तर काही जण उठता बसता उपवास करतात. दुर्गा सप्तशतीचे पठण करतात आणि शैलपुत्रीपासून सिद्धिदात्रीपर्यंत देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. या काळात पश्चिम बंगालमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि भक्ती मेळाव्यांसह भव्य दुर्गा पूजा साजरी केली जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)