फोटो सौजन्य- pinterest
श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे. श्रावण महिन्यात सोमवारला विशेष महत्त्व आहे. यावेळी विधिवत महादेवांची पूजा केली जाते. तर काही जण या दिवशी उपवास देखील करतात. पूजेमध्ये बेलपत्राचा वापर देखील केला जातो. कारण भगवान शिवांना बेलपत्र खूप आवडते. अशा वेळी श्रावण महिन्यात बेलपत्राच्या संबंधित काही उपाय केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि गरिबी दूर होते, अशी मान्यता आहे. महादेवाच्या आशीर्वादाने कधीही पैशाची समस्या जाणवत नाही, असे देखील म्हटले जाते. श्रावण महिन्यात बेलपत्राचे कोणते उपाय करायचे, जाणून घ्या
जर तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये असाल किंवा तुमची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यास दर श्रावणी सोमवारी उपवास करणे हा सर्वोत्तम पर्याय सांगितला जातो. शिवपुराणात उल्लेख केल्यानुसार बेलपत्राच्या पानाखाली ब्राम्हण आणि गरजू व्यक्तीला खीर खायला द्या. श्रावणी सोमवारी हा उपाय केल्याने व्यक्तीची गरिबीपासून मुक्तता होऊन अपार संपत्ती मिळू शकते. हा उपाय व्यक्तीला जीवनामध्ये सुख समृद्धी मिळून देऊ शकते. त्यामुळे व्यक्तीला पैशाची कमतरता भासत नाही.
श्रावणामध्ये बेलपत्राच्या झाडाखाली स्नान करणे फायदेशीर मानले जाते. शक्य असल्यास हा उपाय करणे अत्यंत फायदेशीर आहे. हा उपाय श्रावणामधील प्रत्येक सोमवारी तुम्ही करु शकता. श्रावण महिना खास असल्याने या महिन्यात येणाऱ्या सोमवारला विशेष महत्त्व असते. या दिवशी बेलपत्राचे हे उपाय केल्याने व्यक्तीला मोक्ष मिळू शकतो आणि सर्व प्रकारची पापे देखील नष्ट होऊ शकतात.
श्रावण महिना भगवान शिवाच्या पूजेसाठी खूप खास मानला जातो. यावेळी पूजेदरम्यान बेलपत्रावर एक हजार आठ वेळा ओम नमः शिवाय’ हा मंत्र लिहून त्याचा जप करुन ते बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करणे शुभ मानले जाते. हा उपाय करण्यापूर्वी संकल्प करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. ओम नमः शिवाय’ हा मंत्र लिहून त्याचा जप केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि पापांपासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. मान्यतेनुसार असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो.
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी हा उपाय केल्याने तुम्हाला जीवनातील दुःखापासून मुक्तता मिळू शकते. तसेच महादेवाचे आशीर्वाद देखील मिळतात. श्रावण महिन्याच्या सोमवारी पूजेदरम्याने हवन करावे. हवनाच्या साहित्यामध्ये द्राक्षांचा पाला समाविष्ट करावा. हवनाच्या वेळी ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्रांचा जप करणे फायदेशीर ठरते. असे केल्याने व्यक्तीला जीवनात यश मिळते. त्यासोबतच करिअरमध्ये प्रगतीही होते. बेलपत्राच्या पानांचा वापर करताना ती पाने तुटलेली असू नये.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)