फोटो सौजन्य- pinterest
महादेवांची आराधना करण्यासाठी श्रावण महिना खूप शुभ आणि पवित्र महिना मानला जातो. हा महिना भगवान शिवाला समर्पित आहे. यंदा श्रावण महिन्याची सुरुवात शुक्रवार, 25 जुलैुपासून होत आहे. यावेळी महादेवांना त्याची आवडती पाने अर्पण केल्यास ते प्रसन्न होऊन त्याची भक्तांवर कृपा राहते आणि भक्तांच्या मनातील सर्व दुःख नाहीशी होतात, अशी मान्यता आहे. महादेवाच्या पूजेदम्यान कोणत्या पानांचा वापर करावा जाणून घ्या
महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर करतात. पण आपण शमीचे फूल वापरणे ते सर्वांत खास मानले जाते. शास्त्रामध्ये उल्लेख केल्यानुसार शिवलिंगावर शमीची पाने किंवा फुले अर्पण करणे चांगले मानले जाते. यामुळे महादेव प्रसन्न होतात. त्यामुळे साधकाला इच्छित फळ मिळते, अशी मान्यता आहे.
महादेवांना धतुराची पाने खूप प्रिय आहेत म्हणून या महिन्यात त्यांना धतुराची पाने किंवा फळ अर्पण करणे खूप चांगले मानले जाते. असे म्हटले जाते की, धतुराची पाने अर्पण केल्याने साधकाच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. धार्मिक शास्त्रामध्ये म्हटल्याप्रमाणे, समुद्रमंथनाच्या वेळी बाहेर पडलेल्या विषाचे सेवन महादेवाने स्वतः केले होते. त्यामुळे श्रावण महिन्यात त्यांच्या शरीरातील विषाचा प्रभाव वाढतो. असे म्हटले जाते धतुराची पाने अर्पण केल्याने विषाचा प्रभाव कमी होतो.
श्रावण महिन्यामध्ये महादेवांना अनेक वस्तू अर्पण केल्या जातात. पण यावेळी भांगाची पाने अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात, अशी मान्यता आहे. या पानांमुळे लोकांच्या जीवनात असलेली नकारात्मकता दूर होते. तसेच या पानांचा आयुर्वेदामध्ये देखील औषधी वनस्पती म्हणून उल्लेख केलेला आहे. शिवलिंगावर भांगाची पाने अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते असे म्हटले जाते.
भगवान शिवाचे सर्वांत आवडते पान म्हणजे बेलपत्र. हे पान अर्पण केल्यास महादेव प्रसन्न होतात. त्यासोबतच ब्रम्हा, विष्णू आणि महेश हे देवता देखील प्रसन्न होतात असे म्हटले जाते. कारण बेलपत्रामध्ये या तिन्ही देवतांचा वास असतो असे म्हणतात. यांना तीन भुजांचे प्रतीक देखील मानले जाते. औषधी गुणधर्मांचा खजिना म्हणून बेलपत्राची ओळख आहे. त्यामुळे भगवान शिवाची पूजा करताना बेलपत्राचा वापर करावा. मात्र ते कधीही तुटलेले असू नये याची काळजी घ्यावी.
शिवलिंगावर दुर्वा देखील अर्पण करणे शुभ मानले जाते. भगवान शिवांना दुर्वा खूप प्रिय असल्याचे मानले जाते. दुर्वा अर्पण केल्याने भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. दुर्वा अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनात येणारे अडथळे आपोआप दूर होतात आणि सकारात्मरक उर्जा प्रवास करते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)