फोटो सौजन्य- pinterest
श्रावण महिना काही दिवसांवर आलेला आहे. या महिन्यामध्ये पावसाळी हवामान मनाला शांत करते आणि सर्वत्र धार्मिक वातावरण जाणवते. या पवित्र महिन्यात लोक उपवास करतात, शिवाची पूजा करतात आणि त्यांच्या खाण्याच्या सवयींमध्ये विशेष काळजी घेतात. या महिन्यात लोक मांसाहार करत नाही. तळलेले अन्न टाळतात आणि सात्विक अन्नाला प्राधान्य देतात. मात्र या महिन्यात कढी आणि पालेभाज्या खाणे देखील योग्य आहे का? आयुर्वेदानुसार श्रावण महिन्यात या गोष्टी खाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. कारण याचा संबंध आरोग्याशी असल्याचे म्हटले जाते. श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी खाऊ नये, जाणून घ्या
आयुर्वेदानुसार, पावसाळ्यामध्ये आपल्या पचनसंस्थेसाठी थोडा आव्हानात्मक असतो. या काळात वातावरणात भरपूर आर्द्रता असते, ज्यामुळे शरीरामधील अग्नी म्हणजेच पचनशक्ती कमकुवत होते. ज्यावेळी पचनशक्ती कमकुवत असते त्यावेळी जड, आंबट किंवा थंड पदार्थ पचवणे शरीराला कठीण असते. या गोष्टी खाल्ल्याने गॅस, अपचन, आम्लता किंवा पोट फुगणे यासारख्या समस्या वाढू शकतात.
कढी ही बेसन आणि ताकापासून बनवलेली असते त्यामुळे या गोष्टी पावसाळ्यात खाल्ल्याने पोटाला जड असतात. या ऋतूत गाई ओले गवत खातात, त्यामुळे त्यापासून बनवलेल्या दूध आणि ताकाचे स्वरूप बदलते. त्यामुळे ताक थंड आणि जड मानले जाते, जे पचायला सोपे नसते. शिवाय, बेसन स्वतःच जड असते आणि ताकात मिसळल्यास या मिश्रणाचा पचनावर परिणाम होतो. यामुळे गॅस, अपचन आणि आम्लता सारख्या समस्या उद्भवू शकतात.
सावन महिन्यात पालक किंवा मेथी यासारख्या पालेभाज्या शक्य तितक्या कमी प्रमाणात खाव्यात. कारण या भाज्या थंड स्वभावाच्या असतात आणि या ऋतूत सहज पचत नाहीत. पावसामुळे जमिनीत बॅक्टेरिया, बुरशी आणि कीटकांची वाढ होते, जे हिरव्या भाज्यांच्या पानांमध्ये लपून राहू शकतात. या भाज्या योग्य पद्धतीने न धुता खाल्ल्यास त्यामध्ये जंतु राहू शकतात आणि त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात.
श्रावण महिन्यामध्ये सहज पचणारे असे हलके सर्वोत्तम पदार्थ खावे. खिचडी, मूग डाळ, दुधी भोपळा, शेवगा, बटाटा, पडवळ अशा भाज्या उष्ण स्वभावाच्या असतात ज्याचा आपल्या पचनावर जास्त प्रभाव पडत नाही. शिवाय दूध आणि ताकाऐवजी कोमट दूध किंवा हळदीचे दूध पिणे फायदेशीर आहे. सफरचंद, केळी आणि पपई यांसारखी हंगामी फळे खाणे चांगले. सुकामेवा आणि अक्रोड, चिया बियाणे आणि अळशी बियाणे यांसारख्या बिया देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
यावेळी तळलेले पदार्थ शक्य तितके कमी खावे. त्याचसोबत उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये. फक्त उकळलेले किंवा फिल्टर केलेले पिण्याचे पाणी वापरा. पचन संस्था चांगली राहण्यासाठी व्यायाम आणि प्राणायाम करा. खूप आंबट, थंड आणि जड पदार्थ खाणे टाळा.
श्रावण महिना हा फक्त पूजेसाठीचा महिना नाही तर या काळामध्ये शरीराला डिटॉक्स करण्यासाठी देखील आहे. या महिन्यामध्ये योग्य आहार खाल्ल्यास आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. कढी आणि पालेभाज्या चवीला उत्तम असतात. मात्र त्या पावसाळ्यात खाणे टाळणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. आयुर्वेदाच्या म्हणण्यानुसार, आहारात थोडा बदल करून तुम्ही औषधाशिवाय अनेक आजारांपासून दूर राहू शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)