फोटो सौजन्य - social media
हिंदू धर्मात चार यूग आहेत. प्रत्येक युगाचा एक सिद्धांत आहे, नियम आहेत त्यानुसार या ब्रम्हांडाची दिशा बदलत असते. मानवामध्ये असणारे भाव-भावना, दया-करुणा यूगा-यूगाच्या सिद्धांतांप्रमाणे बदलत असतात. या कलियुगात, मानवातील भाव-भावना आणि दया-करुणा जवळजवळ संपण्यात जमा आहे. मानवी शरीरावर स्वार्थ या भावनेने पूर्णत: ताबा मिळवला आहे. या स्वार्थामुळे जन्मोजन्मीसाठी बांधली गेलेली गाठ आजकाल एका मिनिटात तुटते. याला जबाबदार स्वत: मानव तर असतोच पण त्याचबरोबर मानवाची कुंडलीही तितकीच जबाबदार असते. म्हणतात ना! नशीबात लिहलं आहे तेच होणार. नशीबाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. इथे तो नशीब म्हणजेच कुंडली!
लग्न हे सात जन्मांचे बंधन असते, पण आजच्या काळात जोडीदाराच्या छोट्या उणिवा घटस्फोटाला कारणीभूत ठरतात. ज्योतिष शास्त्र म्हणत की याला जबाबदार कुंडलीत उपस्थित ग्रहांची स्थिती देखील असू शकते. लग्नापूर्वी कुंडली नीट जुळली नाही तर वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात. त्यामुळे विवाहाअगोदर कुंडली जुळणे फार महत्वाचे असते. ज्योतिष शास्त्रात विवाह भावाला सप्तम भावही म्हटले जाते. जर याची व अर्थात याच्या स्वामीची स्थिती कुंडलीमध्ये चांगली असेल तर दुसरा विवाह योग नसतो. पण जर ती स्थिती ठिक नसेल तर कुंडलीमध्ये दुसरा विवाह योग असतो.
तुमच्या कुंडलीत शुक्र प्रतिकूल स्थितीत असेल तर वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. जेव्हा मंगल, राहु, केतु, शनिसारख्या ग्रहांची नजर शुक्रावर असते तेव्हा शुक्र कमकुवत होतो. या समस्येत येणार्या लोकांच्या वैवाहीक जीवनात घटस्फोट होऊन दुसरं लग्न होण्याच्या शक्यता असतात. कुंडलीच्या विवाह भावासह अष्टम आणि नवम घरात मिथुन, कन्या, धनु आणि मीन या द्विस्वभावाच्या राशी असतील तर दुसरे लग्न होण्याची शक्यता जास्त असते. ज्योतिष शास्त्रानूसार राहू आणि केतूपैकी कोणताही ग्रह जर सप्तम भावाआड येत असेल तर दुसरे लग्न होणे अपेक्षित असते.
( ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी. )






