फोटो सौजन्य- pinterest
यंदा दिवाळीला बुध, मंगळ आणि सूर्य मिळून त्रिग्रही योग तयार होणार आहे. हा योग दिवाळीमध्ये 100 वर्षांनंतर तयार होत आहे. ज्याचा शुभ अशुभ परिणाम काही राशीच्या लोकांवर होणार आहे.
दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्येच्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. यंदा दिवाळीचा सण 20 ऑक्टोबर रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीतील हा योग खूप विशेष मानला जातो. या दिवशी त्रिग्रही योग देखील तयार होणार आहे. ग्रहांचा राजा, व्यापार देणारा सूर्य, ग्रहांचा राजकुमार बुध आणि ग्रहांचा सेनापती हे तिन्ही ग्रह यावेळी एकत्र येणार आहेत. दिवाळीच्या दिवशी तूळ राशीमध्ये हा त्रिग्रही योग तयार होणार आहे, या योगाचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर होणार आहे. या काळात काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. त्रिग्रही योगाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होणार, जाणून घ्या
त्रिग्रही योग तूळ राशीमध्ये तयार होणार आहे. हा योग तुळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. हा योग तूळ राशीच्या लग्नाच्या घरात तयार होईल. या काळात तूळ राशीच्या लोकांमधील आत्मविश्वास वाढेल, त्यांना आदर आणि सन्मान मिळेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कठोर घेतलेल्या मेहनतीमुळे त्यांना अपेक्षित यश मिळू शकते.
धनु राशीच्या लोकांसाठी हा योग खूप फायदेशीर ठरणारा आहे. या काळामध्ये तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. या काळात धनु राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन सौदे मिळू शकतात. या काळात तुम्हाला गुंतवणुकीतून चांगले फायदे मिळू शकतात. लॉटरी आणि शेअर बाजारातूनही तुम्हाला अपेक्षित फायदा होऊ शकतो.
मकर राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग हा खूप फायदेशीर राहणार आहे. हा योग मकर राशीच्या कर्मभावात तयार होणार आहे. या काळात मकर राशीच्या लोकांना त्यांच्या कामात आणि व्यवसायात प्रगती अनुभवता येईल. तसेच या काळामध्ये तुम्हाला नवीन व्यवसायाची संधी मिळू शकते. जुन्या प्रकल्पांना गती मिळू शकते. त्यासोबतच नोकरी करणाऱ्या लोकांना इच्छित ठिकाणी स्थानांतरित केले जाऊ शकते. तसेच तुम्ही सामाजिक कार्यात देखील सहभागी होऊ शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)