सर्दी- खोकला झाल्यानंतर लगेच घसा का बसतो?
वातावरणात होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम आरोग्यावर दिसून येतो. थंड वातावरणात जास्त वेळ राहिल्यानंतर किंवा सतत थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे सर्दी, खोकला होण्याची जास्त शक्यता असते. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कोणत्याही वेळी सर्दी होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर तो अंगावर काढला जातो. यामुळे आरोग्य आणखीनच बिघडते आणि ताप किंवा पांढऱ्या पेशी कमी होऊन जातात. त्यामुळे आरोग्यासंबंधित समस्या उद्भवल्यानंतर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक आहे. सर्दी खोकला झाल्यानंतर घशाला सुद्धा लगेच सूज येते. याशिवाय घशात वेदना वाढू लागतात. घशात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण असे न करता योग्य ते औषध उपचार घेऊन आराम मिळवावा. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सर्दी खोकला झाल्यानंतर घशाला सूज का येते? घसा लगेच का बसतो? इत्यादी सर्व गोष्टींची सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
बऱ्याचदा सर्दी किंवा व्हरायल इन्फेक्शन झाल्यानंतर त्याचे परिणाम केवळ नाकावरच नाहीतर संपूर्ण शरीरावर होतात. स्वरयंत्रे, ज्यांच्या कंपनाने आवाजात अनेक बदल दिसून येतात. या बदलांमुळे घशातील इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. यामुळे घशाच्या स्नायूंना सूज येते आणि आवाजावर परिणाम होतो. या स्थितीला मेडिकल भाषेत, लॅरिंजायटिस लॅरिंजायटिस असे म्हणतात. ज्यामुळे घशात सूज आल्यानंतर जडपणा वाढून घशात वेदना होणे किंवा आवाज बदलणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात.
सर्दी खोकला झाल्यानंतर काहीवेळा कफ सुकून जातो. घशात जमा होणाऱ्या कफामुळे आवाजात अनेक बदल होतात. कफाचा चिकट थर स्वरयंत्रांवर जाणून साचून राहतो आणि कंपनाला अनेक अडथळे निर्माण होतात. यामुळे आवाजामध्ये खरखर, गडदपणा किंवा वेगळेपणा जाणवू लागतो. घशात कफ जास्त वेळ साचून राहिल्यास आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. घसा बसल्यानंतर वारंवार खोकल्यास किंवा गळा स्वच्छ केल्यास काहीवेळा नुकसानदायक ठरू शकते. यामुळे घशाच्या स्नायूंवर तणाव येतो आणि घशात लहान मोठ्या जखमा होतात.
घशात वाढलेली खवखव कमी करण्यासाठी गरम पाण्याने शेक घ्यावा. यामुळे नियमित गरम पाणी प्यावे. याशिवाय शक्य झाल्यास ह्युमिडिफायरचा वापर करावा. घशात वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होईल आणि आरोग्य सुधारेल.
घशाचा संसर्ग कशामुळे होतो?
सर्दी आणि फ्लू सारखे विषाणू सामान्यतः घशाच्या संसर्गाला कारणीभूत असतात. स्ट्रेप थ्रोट हे जीवाणूजन्य संसर्गाचे एक सामान्य उदाहरण आहे.
घशाच्या संसर्गाची लक्षणे काय आहेत?
घसा दुखणे किंवा खवखवणे, गिळताना त्रास होणे, ताप, खोकला, सुजलेल्या लिम्फ नोड्स (मानेतील ग्रंथी), घशावर लाल ठिपके येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
घशाचा संसर्ग कसा टाळावा?
नियमितपणे हात धुवा.संसर्गजन्य रोगांच्या संपर्कात येणे टाळा.खोकताना आणि शिंकताना तोंड झाका.