फोटो सौजन्य- pinterest
वास्तूशास्त्रात प्रत्येक दिशेला स्वतःचे महत्त्व आहे. असे मानले जाते की, जर एखाद्या व्यक्तीने वास्तूनुसार वस्तू ठेवल्या तर त्याच्या घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. याउलट वास्तूच्या विरोधात काहीही ठेवले तर घरात अराजकता माजते. यापैकी एक वस्तू म्हणजे आरसा, ज्याला योग्य दिशेने ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.
आरसा नेहमी पूर्व आणि उत्तर दिशेला लावावा. आरशासाठी ही दिशा अतिशय शुभ मानली जाते. या दिशेला आरसा लावल्याने घरात शांतता राहते. तसेच उत्तर दिशा ही संपत्तीची देवता कुबेरची दिशा मानली जाते.
आरसा हा प्रत्येकाच्या घरात असतो पण तो ठेवण्याची योग्य पद्धत माहीत असणारे फार कमी लोक असतात. वास्तूशास्त्रानुसार, घरामध्ये उपस्थित असलेला आरसा अनुकूल दिशेला असेल तर व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते आणि दिशा प्रतिकूल असेल तर घर दरिद्रतेने भरते. घर आणि ऑफिसमध्ये दक्षिण दिशेला आरसा ठेवल्यास काय परिणाम होतात. जाणून घ्या
जर तुमच्या घरात दररोज अशांतता असेल किंवा घरगुती त्रास होत असतील तर याचे मुख्य कारण दक्षिण दिशेला लावलेला आरसा असू शकतो.
जर तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला आरसा असेल तर तो लवकरात लवकर काढून टाका, कारण या आरशाच्या अशुभ प्रभावामुळे तुम्ही गरीब होऊ शकता. त्यामुळे आरसा लावण्याची योग्य दिशा निवडा जेणेकरून तुमच्या प्रगतीच्या संधींना बाधा येणार नाही.
दक्षिण दिशेला लावलेला आरसा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. यासोबतच या ठिकाणी आरसा लावल्याने घरात तणावाचे वातावरण निर्माण होते आणि घरातील सदस्यांमध्ये भांडणे व वाद होतात. या दिशेला लावलेला आरसाही तुमच्या घरात तणावाची परिस्थिती निर्माण करू शकतो.
जर घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर आरसा असेल तर तो तिथून काढून टाका कारण ते तुमचे करियर आणि व्यवसाय खराब करू शकतात. यासोबतच आरशाची ही स्थिती तुमच्या घरातील आशीर्वाद नष्ट करते आणि तुमचे अनेक नुकसान करू शकते.
तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये दक्षिण दिशेला आरसा असेल तर लगेच आरसा काढून टाका. काही कारणास्तव आरसा काढता येत नसेल तर तो झाकून ठेवणे हाच उत्तम उपाय आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)