फोटो सौजन्य- pinterest
दिशेनुसार घरात काही विशिष्ट वनस्पती किंवा फुलझाडे लावल्यास सकारात्मक वातावरण कायम राहते. तसेच घरात सुख-समृद्धी नांदते, असे वास्तुशास्त्राचे अभ्यासक सांगतात. तुळस असो अथवा मनीप्लांटचा वेल, प्रत्येक झाडाचे महत्त्व वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आलेले आहे. वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या फुलाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. जास्वंदीचे लाल फुल झाड पूजाविधीसाठी वापरली जातात. गणपतीच्या पूजेसाठी जास्वंदीचे फूल प्राधान्याने वापरले जाते. जास्वंदीचे झाड घरात लावल्यास अनेक फायदे होतात. जास्वंदीचे रोप घरात लावण्याचे काय आहेत फायदे जाणून घ्या
घरात नेहमी अशांतता असते, पसा टिकत नाही, नकारात्मक वातावरण असते, असे अनेकांच्या बाबतीत होते. वास्तुशास्त्रात यावर अनेक उपाय सांगितले गेले आहेत. योग्य दिशेला फुलझाड किंवा वनस्पतीची लागवड केल्यास या समस्या दूर होऊन शकतात.
जास्वंदीचं लाल फूल गणपतीला विशेष प्रिय आहे. वास्तुशास्त्रात या फुलास विशेष महत्त्व दिले गेले आहे वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घरातले वातावरण चांगले राहते. जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही.
सूर्यदेवाची उपासना आणि पूजाविधीतही लाल जास्वंद फुलाचा वापर केला जातो. धर्मशास्त्र, तसेच वास्तुशास्त्र या दोन्ही शास्त्रांमध्ये जास्वंदीचे झाड शुभ मानले गेले आहे. घरात नकारात्मकता आणि समस्या जाणवत असतील, पैसा टिकत नसेल, तसेच अशांतता असेल तर वास्तुशास्त्र अभ्यासकांच्या सल्ल्याने जास्वंदाचे झाड घरामध्ये लावण्यास काहीच हरकत नाही.
सूर्यप्रकाशासाठी झाड तुम्ही घरातल्या खिडकीजवळही लावू शकता. याव्यतिरिक्त, घरात हे झाड लावण्याचे अनेक फायदे आहेत. लाल फुलांमुळे घराचे सौदर्यं अधिकच खुलतं.
धर्मशास्त्रातही जास्वंदीचे फूल शुभ मानले गेले आहे. हे फूल कालिमाता आणि श्रीगणपतीला अर्पण केलं जाते. जास्वंदीचे फूल सौभाग्याचे प्रतीक मानले गेले आहे.
जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल किंवा अचानक तुमचे काम बिघडले असेल. तर सूर्यदेवाला जल अर्पण करताना त्या पाण्यामुळे जास्वंदाचे फूल घाला आणि ते त्यांना अर्पण करा. असे केल्याने तुमच्या व्यवसायातील कोणत्याही समस्या दूर होतील.
रोजच्या पूजेसाठीदेखील या फुलांचा वापर होतो. मंगळवारी हनुमानाला जास्वंदीचे फूल अर्पण करणे चांगले मानले जाते.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: होय, वास्तुशास्त्रानुसार जास्वंदीचे फूल घरात ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मकता दूर होते.
Ans: जास्वंद प्रामुख्याने देवी दुर्गा आणि भगवान गणेश यांना अर्पण केले जाते. त्यामुळे या फुलाला धार्मिक महत्त्व आहे.
Ans: वास्तुशास्त्रानुसार जास्वंद रोप पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशेला लावणे अधिक शुभ मानले जाते.






