फोटो सौजन्य- pinterest
सनातन धर्मात वट पौर्णिमेचा उपवास विशेषतः दक्षिण भारत, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये साजरा केला जातो. या वेळी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. यंदा वटपौर्णिमा मंगळवार, 10 जून रोजी आहे. सुहासिनी या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करुन उपवास करतात.
वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी करण्याला शुभ मानले जाते. ज्यामुळे विवाहितांचे भाग्य उजळते, असे मानले जाते. तसेच या दिवशी दान केल्याने आर्थिक समस्या दूर होतात, असे देखील मानले जाते. जाणून घ्या वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करावे.
ज्येष्ठ पौर्णिमा तिथी मंगळवार, 10 जून रोजी सकाळी 11.35 वाजता सुरू होईल आणि 11 जून रोजी दुपारी 1.13 वाजता संपेल. या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी मुहूर्त दुपारी 2.5 वाजता असेल.
वट पौर्णिमेच्या दिवशी महिलांनी सकाळी स्नान करावे आणि लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. नंतर पूजा साहित्य घेऊन वडाच्या झाडाजवळ जावे. नंतर झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करावे आणि फुले, तांदूळ, फुले, भिजवलेले हरभरा, गूळ आणि मिठाई अर्पण करावी.
वटपौर्णिमेला अन्नाचे दान करणे शुभ आणि पुण्याचे मानले जाते. अन्नाचे दान केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची आपल्यावर कृपा राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. विशेष म्हणजे अन्नदान केल्याने पापांचा नाश होतो आणि मन शुद्ध होते, असे देखील म्हटले जाते. त्याचबरोबर ग्रह दोष देखील दूर होतात.
वटपौर्णिमेच्या दिवशी वस्त्रदान करणे शुभ मानले जाते. वस्त्रदान केल्याने व्यक्तीला फायदा होतो. शिवाय वस्त्रदान केल्याने व्यक्तीला जीवनात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तसेच जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही.
वटपौर्णिमेच्या दिवशी जलदान करणे हे सर्वांत श्रेष्ठदान मानले जाते. पाणी हे जीवन आहे. पाण्याला अमृत देखील म्हटले जाते. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी पाण्याचे दान करावे.
वडाचं झाड केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर पर्यावरणदृष्ट्याही फार महत्त्वाचं मानलं जातं. यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं निवासस्थान मानलं जातं. वडाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा मारून महिलांनी कच्च्या दोऱ्याने वडाच्या बुंध्याभोवती फेऱ्या मारणे हे एकनिष्ठतेचं प्रतीक मानलं जातं. या सात फेऱ्या म्हणजे सात जन्मांचं नातं असं मानलं जातं.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)