फोटो सौजन्य- istock
हिंदू धर्मामध्ये घरात रोज धूप दाखवण्याचे विशेष महत्त्व आहे. जर धूप घरभर नियमितपणे धूप दाखवल्यास घरातील समस्या दूर होतील. प्रत्येक घरामध्ये सकाळी उठून देवपूजा केली जाते. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही पूजेमध्ये धूप किंवा अगरबत्तीचा वापर केला जातो त्याशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही. मात्री ही सवय आपल्या शरीरासाठी कितपत योग्य हे माहीत असणे गरजेचे आहे. पूजेच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या धूप किंवा अगरबत्तीचा धूर तुमच्या नाका तोंडात गेल्याने शरीरावर परिणाम होऊ शकतात.
काही व्यक्तींना अगरबत्ती किंवा धुपाच्या धुरांमुध्ये असणाऱ्या केमिकलमुळे फुफ्फुसांशी संबंधिक समस्या उद्भवतात. अगरबत्ती आणि त्यामध्ये वापल्या जाणाऱ्या पॉली ॲरोमए्ॅटिक हायड्रोकार्बन्समुळे फुफ्फसांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. या धुराच्या संपर्कात आल्यामुळे फुफ्फसांच्या पेशींमध्ये जळजळ होते.
काही व्यक्ती जास्त वेळ धुराच्या संपर्कात आल्यास डोळा किंवा त्वचेच्या संदर्भातील अॅलर्जी होऊ शकते. धूप किंवा अगरबत्ती जाळल्याने डोळ्यांमध्ये जळजळ होते. तसेच त्वचेला खाजदेखील येते.
अगरबत्तीच्या धुरामुळे काहींच्या मानसिकतेवर परिणाम होतो तर काही ना फ्रेश वाटते, काही लोकांना त्याचा सुगंध आवडत नाही. मात्र, याचा वापर दीर्घकाळ करता राहिल्यास डोकेदुखी, एकाग्रतेचा अभाव, डिमेंशिया आणि अल्झायमर यासारखे आजार उद्भवण्याची शक्यता असते.
हा धूर श्वसन क्षमतेवर परिणाम करतो. धुराच्या जास्त संपर्कात आल्यास तुम्हाला श्वास घेताना त्रास होऊ शकतो. या धुरातून कार्बन मोनोऑक्साइड हवेत पसरतो. त्यामुळे फुफ्फुसांच्या पेशींमध्ये जळजळ होण्यास सुरुवात होते.
जर धूप नियमितपणे घरभर दाखवले तर आयुष्यातील अनेक समस्या स्वतःच निघून जातील. वेगवेगळ्या प्रकारे धूप दाखवल्याने विविध प्रकारच्या समस्या दूर होतात.
धूप लावल्याने फक्त मन शांत होत नाही. याउलट कुटुंबात राहणाऱ्या सर्व सदस्यांचे रोग आणि दुःख देखील दूर होतात. ग्रहांच्या हालचालींमुळे होणारा तणाव देखील हळूहळू कमी होतो. ग्रह-संघर्षाच्या समस्येपासूनही आराम मिळतो. कोणत्याही प्रकारची नकारात्मकता घरात प्रवेश करू शकत नाही. लोभानला अंगारावर ठेवल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. परंतु लोभान जाळण्यापूर्वी त्याचे काही विशेष नियम आहेत ते लक्षात ठेवा.
वास्तूदोषाने त्रस्त असाल तर कडूलिंबाची पाने घेऊन त्याचा धुर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घरभर दाखवावा. यामुळे, सर्व प्रकारचे जीवाणू नष्ट होतील, तसेच वास्तू दोष देखील दूर होईल. याव्यतिरिक्त प्रत्येक शनिवारी संध्याकाळी धूप-दीप करावे. या उपायाने आयुष्यात संपत्ती आणि समृद्धीचे मार्ग उघडले जातात आणि शनि दोषही दूर होतो.
दररोज धूप देणे शक्य नसेल तर तेरस, चौदस, अमावस्या आणि पौर्णिमेला सकाळ-संध्याकाळ धूप अवश्य द्यावे. जेव्हा धूप देण्यासाठी जाल तेव्हा त्यापूर्वी घर स्वच्छ केले पाहिजे. तुम्ही सुद्धा अंघोळ करून पवित्र झाल्यानंतरच धूप द्या. ईशान्य भागात धूप ठेवा म्हणजे घरातील सर्व खोल्यांमध्ये त्याचा सुगंध पसरतो. त्याच वेळी, सूर्याची आणि देवाची प्रार्थना करा.
( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)