'परग्रहावरून एलियन आले होते तेव्हा...' CIA कडून जाहीर केलेल्या एका फाईलने जगभरात खळबळ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
वॉशिंग्टन डीसी : अमेरिकन गुप्तचर एजन्सी सीआयएकडून अलिकडेच जाहीर केलेल्या एका फाईलने जगभरात खळबळ उडाली आहे. या कागदपत्रात असा दावा करण्यात आला आहे की, शीतयुद्धादरम्यान म्हणजे १९८९ किंवा १९९० मध्ये सायबेरियात रशियन सैनिक आणि एका अज्ञात उडती तबकडी यांच्यात एक भयानक चकमक झाली होती, त्यात २३ सैनिक अक्षरशः दगड झाले होते. त्यातून एक अदभूत आणि अविश्वनीय घटना घडली होती. हे दस्तऐवज मूळतः २००० मध्ये अवर्गीकृत करण्यात आले होते. ते अलीकडेच सीआयएच्या वेबसाइटवर प्रकाशित झाले, त्यानंतर ते व्हायरल झाले आहे.
त्या घटनेत नेमकं काय घडलं ?
रशियन सैन्य सायबेरियात नियमित प्रशिक्षण सराव करत असताना ही घटना घडली. अचानक कमी उंचीवर उडणारी एक बशीच्या आकाराची उडणारी वस्तू सैनिकांवर घिरट्या घालू लागली. यावेळी एका सैनिकाने या तबकडीवर जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र डागले, ती तबकडी जवळच कोसळली. या कागदपत्रात असा दावा करण्यात आला आहे की, क्रैश झालेल्या तबकडीमधून मोठे डोके आणि काळ्या डोळ्यांसह पाच लहान प्राणी बाहेर आले.
हे प्राणी ज्यांना एलियन असल्याचे म्हटले जाते. ते एकत्र आले आणि एका गोलाकार वस्तुमध्ये विलीन झाले, पुढे या गोलाकार वस्तूचा स्फोट झाला आणि एक तेजस्वी पांढरा प्रकाश पडला आणि त्यासोबत मोठा आवाजही आला. या स्फोटात २३ सैनिकांचे मृतदेह तात्काळ दगडी खांबात रूपांतरित झाले. या हल्ल्यातून फक्त दोन सैनिक वाचले कारण ते सावलीत उभे होते आणि त्यांना पूर्णपणे प्रकाश मिळाला नव्हता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बांगलादेश पोलिसांचा मोठा निर्णय; शेख हसीना यांच्याविरुद्ध इंटरपोलकडे ‘Red Corner Notice’ची मागणी
केजीबीचा २५० पानांचा अहवाल काय म्हणतो?
हे एक-पानाचे सीआयए दस्तऐवज सोव्हिएत युनियन अर्थात रशियाच्या विघटनानंतर १९९१ मध्ये प्राप्त झालेल्या २५० पानांच्या सोव्हिएत गुप्तचर संस्था केजीबी फाइलवर आधारित असल्याचे म्हटले जाते. या फाईलमध्ये घटनेच्या प्रत्यक्षदर्शीचे जबाब छायाचित्रे आणि रेखाचित्रे आहेत. केजीबीच्या अहवालानुसार, दगडमार झालेल्या सैनिकांचे अवशेष आणि ती तबकडी मॉस्कोजवळील एका गुप्त वैज्ञानिक संशोधन केंद्रात नेण्यात आले. सोव्हिएत शास्त्रज्ञांना असे आढळून आले की जिवंत सैनिकांचे रूपांतर एका अज्ञात ऊर्जा स्त्रोताद्वारे चुनखडीसारख्या पदार्थात झाले.
ज्याची आण्विक रचना सामान्य चुनखडीशी जुळते
सीआयएच्या अहवालात एका अनामिक प्रतिनिधीचा हवाला देऊन म्हटले आहे की, जर केजीबी फाइल वास्तवाशी जुळत असेल तर हे अत्यंत धोकादायक प्रकरण आहे. एलियन्सकडे अशी शखे आणि तंत्रज्ञान आहे जे आपल्या सर्व कल्पनांच्या पलीकडे आहे. हल्ला झाल्यास ते स्वतःचा बचाव करू शकतात. हे विधान त्या काळातील मानसिकतेचे प्रतिबिंच आहे, जेव्हा शीतयुद्धाच्या काळात दोन्ही महासत्ता (अमेरिका आणि रशिया) अज्ञात उडणाऱ्या वस्तूंबद्दल सतर्क होत्या.
त्या उडत्या तबकडीविषयी जागतिक स्तरावर कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. २०२० मध्ये अमेरिकेच्या संरक्षण विभागाने अज्ञात उडती तबकडी टास्क फोर्सची स्थापना केली, ज्याचा उद्देश राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू शकणाऱ्या अज्ञात वस्तू शोधणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि त्यांची यादी करणे आहे. शिवाय, २०२५ च्या सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उडत्या तबकडी संबंधित दशके जुन्या सरकारी फायली उघड करण्याचे आदेश दिले, ज्यामुळे या विषयावर आणखी अटकळ निर्माण झाली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हुकूमशाहीविरोधात मोठी चळवळ उभी राहताना; ट्रम्प सरकारविरोधात अमेरिकेत संतापाची लाट हजारो नागरिक रस्त्यावर
हे खरे आहे की मिथक ?
हे खरोखरच एलियन्सशी झालेली चकमक होती की शीतयुद्धादरम्यानच्या गैरसमज आणि चुकीच्या माहितीचा परिणाम होते? या प्रश्नाचे उत्तर अजूनही स्पट नाही. या कागदपत्रात जिवंत सैनिकांकडून थेट विधानांचा अभाव आणि मृत अवशेषांची कोणतीही वैज्ञानिक पृष्टी नसल्यामुळे या फाइलच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. तरीही, हा प्रसंग या विशाल विश्वात आपण एकटेच आहोत का ? या मानवतेच्या शाश्वत प्रश्नाला पुन्हा जिवंत करते… एवढे मात्र निश्चित