आज़ाद हिंद फौजची पहिली महिला गुप्तहेर; कोण आहेत नीरा आर्य
Female Spy Neera Arya: भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील एक अत्यंत धाडसी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे नीरा आर्य. त्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील आझाद हिंद फौजेतील पहिल्या महिला गुप्तहेर म्हणून ओळखल्या जातात. नीरा आर्य यांचा जन्म ५ मार्च १९०२ रोजी उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील खेकरा शहरात झाला. लहानपणापासूनच त्यांच्या मनात देशभक्तीची भावना होती. त्यांना भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभागी व्हायचे होते. याच ध्येयाने प्रेरित होऊन त्या नेताजींच्या आझाद हिंद फौजेमधील ‘राणी झाशी रेजिमेंट’मध्ये सामील झाल्या. ही महिला सैनिकांची विशेष तुकडी होती.
नीरा यांचे लग्न श्रीकांत जय रंजन दास नावाच्या ब्रिटिश सैन्यातील सीआयडीमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याशी झाले होते. मात्र, दोघांचे विचार पूर्णपणे वेगळे होते. नीरा या भारतमातेच्या मुक्तीसाठी झुंजत होत्या, तर श्रीकांत ब्रिटिश सत्तेची साथ देत होते. नीरा आर्य यांची कहाणी केवळ देशभक्तीची नाही, तर त्याग, साहस आणि निष्ठेची एक अपूर्व गाथा आहे. त्यांनी आपल्या देशासाठी केलेले बलिदान आजही प्रेरणादायी आहे.
राष्ट्रपतींनी मांडली तब्बल 14 प्रश्नांची प्रश्नावली; मात्र सुप्रीम कोर्ट देणार का उत्तर सगळी?
उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील खेकडा नगर येथे ५ मार्च १९०२ रोजी जन्मलेल्या नीरा आर्य या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक पराक्रमी आणि धैर्यवान सेनानी होत्या. त्यांना सेठ छज्जूमल यांनी दत्तक घेतले होते. ते कोलकात्यातील एक श्रीमंत व्यापारी होते. त्यांनी नीरा यांना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले. लहानपणापासूनच त्यांच्या मनात देशभक्तीची भावना ठासून भरलेली होती आणि भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होण्याची त्यांची तीव्र इच्छा होती.
नीरा आर्य या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील ‘आझाद हिंद फौज’मध्ये दाखल झाल्या आणि राणी लक्ष्मीबाई रेजिमेंट या महिला लष्करी पथकाचा भाग झाल्या. त्यांचे लग्न ब्रिटिश लष्करातील अधिकारी व सीआयडी इन्स्पेक्टर श्रीकांत जय रंजन दास यांच्याशी झाले होते. मात्र दोघांचे विचार पूर्णपणे विरोधी होते. नीरा या देशासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसेनानी होत्या, तर त्यांच्या पतीने ब्रिटिश सत्तेची साथ दिली होती.
एकदा नीरा आर्य या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची गुप्तपणे भेट घेण्यासाठी गेल्या असता, श्रीकांत यांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांनी नेताजींच्या ड्रायव्हरवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे नेताजींच्या जीवाला धोका निर्माण झाला. नेताजींचे प्राण वाचवण्यासाठी नीरा यांनी आपल्या पतीला ठार मारण्याचा निर्णय घेतला. हा त्याग त्यांनी देशभक्तीच्या भावनेतून केला होता आणि भारताप्रती त्यांची निष्ठा किती खोलवर आहे, हे त्यांनी जगाला दाखवून दिले.
‘दर्पणकार’ मराठीतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन; जाणून घ्या 18 मे चा इतिहास
या घटनेनंतर ब्रिटिशांनी त्यांना अटक केली आणि अंदमान-निकोबारच्या तुरुंगात पाठवले. तिथे त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. मात्र, नीरा यांनी आपल्या देशभक्तीपासून माघार घेतली नाही. त्यांनी नेताजी किंवा इतर स्वातंत्र्यसैनिकांविषयी कोणतीही माहिती ब्रिटिशांना दिली नाही. त्यांच्या धैर्य आणि निष्ठेमुळे नेताजींनी त्यांना आझाद हिंद फौजची ‘पहिली महिला गुप्तहेर’ म्हणून गौरविले.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर नीरा आर्य यांनी एकांतात आणि साध्या जीवनशैलीत आपले उर्वरित आयुष्य व्यतीत केले. दुर्दैवाने, त्यांच्या बलिदानाची आणि कार्याची फारशी दखल घेण्यात आली नाही. २६ जुलै १९९८ रोजी हैदराबादमधील चारमिनारजवळील उस्मानिया रुग्णालयात त्यांचे निधन झाले. नीरा आर्य यांची कहाणी ही देशभक्ती, बलिदान आणि स्त्रीशक्तीचे प्रतीक आहे. त्यांनी दाखवून दिले की, महिलाही देशाच्या रक्षणासाठी कोणताही त्याग करण्यास सिद्ध असतात आणि त्या कुठल्याही बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाहीत.