खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि खरी वस्तुस्थिती ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Moon land ownership legality : भारताच्या चांद्रयान मोहिमेनंतर आणि चंद्राकडे वाढत्या जागतिक हालचालींमुळे एक प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे “पृथ्वीप्रमाणे, एखादा देश किंवा व्यक्ती चंद्रावर जमीन खरेदी करू शकतो का?” या प्रश्नाचे उत्तर केवळ उत्सुकता भागवणारे नाही, तर अंतराळातील कायद्यांचा वेध घेणारेही आहे.
सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे १९६७ चा ‘बाह्य अवकाश करार’ (Outer Space Treaty). संयुक्त राष्ट्रांच्या अधिपत्याखाली झालेल्या या करारावर १०० हून अधिक देशांनी स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार
चंद्र किंवा इतर कोणताही खगोलीय पिंड कोणत्याही देशाची मालमत्ता असू शकत नाही.
कोणताही देश चंद्रावर सार्वभौमत्वाचा दावा करू शकत नाही.
एखाद्या देशाने चंद्रावर ध्वज लावला तरी तो फक्त प्रतीकात्मक असतो, त्यातून मालकी हक्क मिळत नाही.
१९७९ मधील ‘चंद्र करार’ (Moon Agreement) या नियमांना आणखी बळकट करतो. या करारानुसार, चंद्रावरील संसाधनांचा व्यावसायिक वापर किंवा भूभागावर दावा करणे प्रतिबंधित आहे. संशोधनापुरते कार्य परवानगीचे आहे, पण त्याहीसाठी आंतरराष्ट्रीय सहमती आवश्यक आहे. याशिवाय आणखी काही करार अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी, अंतराळातील वस्तूंची नोंदणी करण्यासाठी आणि मोहिमांमुळे उद्भवणाऱ्या नुकसानीसाठी जबाबदारी निश्चित करतात.
अमेरिका, चीन आणि इतर काही देश हेलियम-३ आणि प्लॅटिनमसारख्या मौल्यवान संसाधनांसाठी चंद्रावरील खाणकामाचा अभ्यास करत आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जमिनीवर दावा करता येत नसला तरी, मिळालेल्या संसाधनांवर मालकी हक्क मिळू शकतो—तेही कठोर अटींसह. प्रत्यक्षात, चंद्रावर खाणकाम करणे अत्यंत खर्चिक आणि धोकादायक आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : RMG Sector Collapse : भारताशी पंगा घेण्याची युनूसला मोजावी लागली मोठी किंमत; दीड लाख बांगलादेशी उतरले रस्त्यावर
तुम्ही ऐकले असेल की काही कंपन्या, जसे की Lunar Society International किंवा International Lunar Lands Registry, चंद्रावर भूखंड विकण्याचा दावा करतात. भारतातील अनेक लोक, अगदी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्यासह, अशा कंपन्यांकडून ‘चंद्रावरची जमीन’ खरेदी केली आहे.
या कंपन्या साधारणतः स्मरणिका प्रमाणपत्र (Memorabilia Certificate) देतात. एका एकर जागेची किंमत सुमारे ₹३,००० इतकी सांगितली जाते, जी पृथ्वीवरील जमिनीच्या तुलनेत अत्यल्प आहे. पण या व्यवहाराला कोणताही कायदेशीर आधार नाही. हा केवळ भावनिक किंवा फॅशनसाठी केला जाणारा खरेदीचा प्रकार आहे, ज्यातून प्रत्यक्ष मालकी हक्क मिळत नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अब्जाधीशाचा महाल, पत्नीचा पुतळा आणि शांततेचा भंग! मार्क झुकरबर्गच्या ‘गोल्डन कॅसल’मुळे पालो अल्टोमध्ये खळबळ
पृथ्वीप्रमाणे चंद्रावर जमीन खरेदी करणे किंवा त्यावर मालकी हक्क सांगणे सध्या शक्य नाही. हे स्पष्टपणे आंतरराष्ट्रीय करारांमध्ये नमूद आहे. तुम्ही ‘चंद्रावरची जमीन’ विकत घेतली तरी ती फक्त कागदावरची भावनिक नोंद आहे. मात्र, भविष्यात चंद्रावरील संसाधनांचा वापर, अंतराळ पर्यटन आणि संशोधनामुळे नवी कायदेशीर आव्हाने निर्माण होण्याची शक्यता नक्कीच आहे. तोपर्यंत, चंद्राकडे पाहून कविता लिहिणे आणि स्वप्न बघणे हेच जास्त वास्तववादी