फोटो सौजन्य: iStock
अनेकदा आपण कंटाळा आला, थकवा जाणवला किंवा काम करताना झोप लागू नये म्हणून टहा किंवा कॉफी पितो. कॉफी हे आपल्याला एकदम ताजेतवाने करणारे पेय आहे. त्याचा गोडवा माणसाच्या मनाला मानसिक शांती देतो. कॉफी हे रोस्ट केलेल्या कॉफी बीन्सपासून तयार होणारे एक प्रिय पेय आहे. एस्कॅप्रेसो, लाटे सारख्या विविध प्रकारात तयार होणारी कॉफी जगभरात पसंत केली जाते.
पण तुम्हाला माहिती आहे का कॉफीच्या नियमित, पण माफक प्रमाणात कॉफी पिल्याने हृदय, यकृत, आणि मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.कॉफीच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होत असताना, शास्त्रीय संशोधनात कॉफीचे अनेक आरोग्यदायी फायदेही समोर आले आहेत. कॉफीमधील अँटीऑक्सिडंट्स आणि कॅफिनमुळे त्याचे नियमित सेवन शरीराला अनेक प्रकारे लाभदायक ठरते.
आज आपण या लेखात कॉफी चे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.
कॅन्सर व हृदयविकाराचा धोका कमी होणे
अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की रोज 2-3 कप कॉफी प्यायल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. विशेषतः यकृताच्या कर्करोगासाठी हे कॉफी उत्तम ठरते. संशोधनानुसार, दररोज कॉफी पिणाऱ्यांना हृदयरोग, स्ट्रोक आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी असतो. चीनमधील सोचो विद्यापीठातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार, दररोज 200-300 मिलीग्राम कॅफिनचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सोचो युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी ब्रिटनमधील 37 ते 73 वयोगटातील 500,000 लोकांचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढले.
हे देखील वाचा- किटकांवर निर्भर असलेला लहानसा खादाड ‘योद्धा’ कोळी; निसर्गाचा कीटकनाशक
मेंदू व मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर
तज्ज्ञांच्या मते, दररोज कॉफी प्यायल्याने पार्किन्सन्स व अल्झायमरचा धोका कमी होतो. कॉफीमधील अँटीऑक्सिडंट्स मेंदूचे स्वास्थ्य टिकवण्यास मदत करतात. तसेच, कॉफीचे नियमित सेवन स्मरणशक्ती सुधारण्यात सहायक ठरते आणि मेंदू अधिक सक्रिय ठेवते. कॉफी तणाव कमी करण्यातही मदत करते, त्यामुळे ती मानसिक आरोग्यासाठी देखील लाभदायक ठरते.
इतर शारीरिक फायदे
ब्लॅक कॉफी हे कॅलरी-मुक्त पेय असल्याने वजनात बॅलेन्स राखण्यास मदत करू शकते. कॅफिनमुळे चयापचय क्रिया वेगाने होते व शरीराला ऊर्जा मिळते. तसेच, रक्तातील एड्रेनालाईन पातळी वाढल्यामुळे शरीर शारीरिक श्रमासाठी सज्ज होते.
रक्तदाब आणि हृदयविकाराशी असलेले संबंध
अनेकांना वाटते की, कॉफीमुळे रक्तदाब वाढतो, परंतु संशोधकांना दीर्घकालीन अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की कॉफीचे नियमित सेवन केल्याने रक्तदाबावर तात्पुरता प्रभाव पडतो. नंतर तो कालांतराने कमी होतो. नियमित कॉफी सेवनामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होण्याची शक्यता असते. यामुळे अलीकडे कॉफी आजच्या बदलत्या जीवनशैलीत एक ताजेतवाने पेय ठरत आहे. कॉफीचे शास्त्रीय दृष्टिकोनातून अनेक फायदे सिद्ध झाले आहेत. मात्र, कोणतेही पेय वा अन्न जास्त प्रमाणात घेणे हानिकारक ठरू शकते. त्यामुळे कॉफीचे अती सेवन शरिरासाठी हानिकारक देखील ठरू शकते.
हे देखील वाचा- पक्ष्यांच्या दुनियेतील रहस्य: एक असा पक्षी जो मागच्या दिशेनेही उडतो; जाणून घ्या कसे?
टीप: वर दिलेली माहिती केवळ तुमच्या माहितीसाठी देण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांशी आणि डॉक्टरांशी चर्चा करा.