फोटो सौजन्य - Social Media
सर अर्नेस्ट शॅकलटन हे नाव भारतात इतके प्रसिद्ध नसले तरी विशाल सागराच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदले गेले आहे. त्यांनी गाजवलेला पराक्रम हा लक्षणीय आहे. हा असा पराक्रम आहे की ते पुन्हा करण्याचे धाडस फारच कमी जणांमध्ये असेल. 1910 च्या दशकात त्यांनी अंटार्टिकसारखा भूखंड एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत पार करण्याचा निर्धार केला. त्याकाळी ही गोष्ट जवळजवळ अशक्यच होते कारण अंटार्टिका हा असा भूखंड आहे जिथे मानवी वस्ती नाही, ज्या ठिकाणावर कोणताही देश आपला हक्क गाजवू शकत नाही अशा ठिकाणी त्यांचा हा निर्धार पूर्ण करण्यासाठी 27 जणांसह शॅकलटन एन्ड्युअरन्स जहाजावरून इंग्लंडहून निघाले. ऑगस्ट 1914 साली त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली.
जॉर्जियाच्या बेटावरून त्यांनी प्रवासाला सुरुवात केला. अंटार्क्टिकाच्या जवळ पोहोचतात तेथे वेडेल समुद्र नावाचा बर्फाच्छादित सागर लागतो. आधी या समुद्राला पार करावे लागते नंतरच व्यक्ती अंटार्टिका भूखंडावर पोहोचतो. पण एन्ड्युअरन्सने याच समुद्रात बर्फाच्या थरांमध्ये अडकून हार मानली. जानेवारी 1915 मध्ये त्यांची जहाज वेडेल समुद्राच्या बर्फात अडकली पण पुढच्या 7 ते 8 महिन्यांसाठी ते जहाजच त्यांचे घर बनले. पण पुढे ऑक्टोबर 1915 मध्ये ते जहाज कोसळून पाण्यात बुडाले. सुदैवाने, धोका वेळीच ओळखून शॅकलटन त्यांच्या 27 साथीदारांसह जहाजाच्या खाली उतरले होते.
गेले 7 ते 8 महिने ते वेडेल समुद्रावर तरंगणाऱ्या एका बर्फाच्या छोट्याशा भूखंडावर राहत होते. त्यांना माहीत होतं की ज्या उद्दिष्टासाठी ते इथे आले आहेत ते आता काही शक्य नाही, त्यामुळे आता सगळे यातून स्वतःचा बचाव करत, पुन्हा माघारी कसे परतता येईल? याचा विचार करत होते. सध्या ते एका समुद्रावर तरंगणाऱ्या बर्फाच्या भूखंडावर होते. त्यामुळे ते बर्फ जिथे वाहत जाईल तेच त्यांचे मार्ग होते. अनेक वादळं खात, अनेकवेळा दिशा बदलत अखेर ते बर्फ Elephant बेटावर येऊन थांबते. या दरम्यान, त्यांना अनेक महिने लागले. या महिन्यात त्यांचे सगळे खाद्य राशनही संपले होते, तेव्हा त्यांनी आपल्या सोबत आणलेल्या श्वानंची हत्या करून त्यांचे मांस खाल्ले. बर्फाळ परदेशात भटकणाऱ्या पेंग्विन तसेच seal चे कच्चे मांस खाऊन ते 27 जण जिवंत राहिले. बर्फ असल्याने त्यांना पिण्यास स्वच्छ पाणी तर मिळतच होते.
वर्ष उलटला आता काही तरी केलं पाहिजे या विचाराने त्या 27 जणांमधील 5 जणं शॅकलटनच्या बरोबर पुढचा मार्ग शोधून काढण्यासाठी आपल्या जवळ असणाऱ्या लहान नौका घेऊन निघाले. या दरम्यान त्यांना ड्रेक Passage नावाचा जगातील सगळ्यात भयंकर समुद्राला सामोरे जावे लागणार होते. असे म्हणतात की या समुद्रात 60 ते 70 मीटरपर्यंत ही लाटा येतात. ज्या समुद्रात मोठ्या जहाजांचा टिकाव लागत नाही त्या समुद्रात ही लहान नौका आणि हे 5 जणं काहीच करणार. पण त्यांनी ते करून दाखवलं. 15 ते 16 दिवसांचा, उंच लाटांचा आणि वादळी वाऱ्यांचा सामना करत, ते जॉर्जिया बेटावर पोहचले.
हे तेच बेट होते जेथून ऑगस्ट 1914 मध्ये त्यांनी प्रवास सुरू केला होता. पण येथे ही त्यांच्या नाशिबी त्रासशिवाय काही नव्हतं. त्यांचं सुख त्यांच्यापासून आणखीन 26 मैल जरी दूर असले तरी तू वाट अशा डोंगरदऱ्यांच्या होती, जे त्यावेळी कुणीही पार करू शकलेले नव्हते. हे 5 खलाशी, बेटाच्या विरूद्ध बाजूला येऊन पोहचले होते आणि त्याची नौकाही लाटांचा मारा खात तुटून गेली होती. त्यामुळे त्यांना ते डोंगरदऱ्या पार करणे भागच होते. 36 तासांच्या खडतर प्रवासानंतर त्यांना अखेर मानवी वस्ती दिसली. जॉर्जियाच्या त्या डोंगररांगांना पार करणारे ते पहिले व्यक्ती ठरले. अंगात बळ नव्हतं पण आत्मविश्वास होता, त्या जिद्दीने त्यांनी तो विक्रम पार केला.
ऑगस्ट 1994 ला सुरू झालेला तो थरार 30 ऑगस्ट 1996 म्हणजेच जवळ दोन वर्षांनी संपला. एक नवीन जहाज तयार करून पुन्हा Elephant बेटावर जाण्यात आले आणि तिथे संघर्ष करणाऱ्या उर्वरित खलाशांना वाचवण्यात आले. मुख्य म्हणजे गेले होते 27 जणं आणि इतक्या थराराला सामोरे जाऊनही परतलेही 27 जणंच! एका कुशल नेतृत्वाचा संग्राम….






