Independence Day : जाणून घ्या काय आहेत स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवण्याचे आणि उतरवण्याचे नियम (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Rules of Flag Hosting : दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरात स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा केला जातो. यंदा आपण ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या दिवशी लाल किल्ल्यांपासू न ते देशभरातील शाळा-महाविद्यालये सरकारी कार्यालये, गावा गावांमध्ये ध्वजारोहण केले जाते. देशातील प्रत्येक व्यक्तीी हा दिवस सर्व बंधने धर्म, जात, वर्ग अशा सर्व बंधने तोडून स्वातंत्र्यदिन साजरा करतो. या दिवशी “हर घर तिरंगा” ही मोहीम देखील सुरु करण्यात आली आहे.
ध्वजारोहण ही प्रत्येकासाठी एक अभिमानाची बाब आहे. परंतु ध्वजारोहण करताना याचे काही नियम आहेत. तसेच ध्वज उतरवण्याचेही काही नियम आहे. हे नियम बहुदा लोकांना माहित नसतात. आज आपण या लेखातून हे नियम जाणून घेणार आहोत.
भारताची ध्वज संहिता २६ जानेवारी २००२ मध्ये लागू करण्यात आली. यामध्ये तिरंग्याचा अपमान होणार नाही यासाठी काही नियमावली ठरवण्यात आली आहे.
या सर्व नियमांचे प्रत्येक भारतीयाने पालन केले पाहिजे. देशाच्या सन्मान आणि त्याची सुरक्षितता हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.