स्री शिक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांची जयंती; जाणून घ्या १८ एप्रिलचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
आज स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाहाचे कर्ते समाजसुधारक महर्षी धोंडव केशव कर्वे यांची जयंती आहे. त्यांचा जन्म रुडमध्ये 18 एप्रिल 1858 रोजी झाला होता. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांच्या शिक्षणासाठी आणि विधवांच्या हक्कांसाठी समर्पित केले. त्यांनी महिलांसाठी १९१६ मध्ये भारतातील पहिले SNDT महिला विद्यापीठ स्थापन केले होते. ज्यामुळे मुलींसाठी शिक्षणाची कवाडे खुली झाली. त्यांच्या कार्यामुळे महिलांना स्वाभीमानाने आयुष्य जगण्याची संधी मिळाली. त्यांनी नेहमीच समानता आणि प्रबोधनाचा संदेश समाजाला दिला आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना भारतरत्न सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.
18 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
1336 : हरिहर आणि बुक्का यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली.
1703 : औरंगजेबाने सिंहगड काबीज केला.
1720 : शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली.
1831 : अलाबामा विद्यापीठाची स्थापना झाली.
1853 : मुंबई ते ठाणे नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.
1898 : जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी.
1912 : टायटॅनिकमधील 705 वाचलेल्यांना घेऊन कार्पाथिया जहाज न्यूयॉर्कला पोहोचले.
1923 : शिवजयंतीला पुण्यातील शिवाजी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यातील पहिला संगमरवरी अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला.
1924 : सायमन आणि शुस्टर यांनी पहिले क्रॉसवर्ड पझल पुस्तक प्रकाशित केले.
1930 : क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटला.
1930 : आज काहीही बातमी नाही असे बी. बी. सी. या नभोवाणी केंद्रावरुन सांगण्यात आले.
1936 : पेशव्यांची राजधानी पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्यात आला.
1950 : आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली गावात भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.
1954: गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली.
1971 : एअर इंडियाचे पहिले बोईंग 747 जंबो जेट विमान सम्राट अशोक हे सांताक्रूझ विमानतळावर दाखल झाले.
2001 : ग्राउंड सॅटेलाइट प्रक्षेपण वाहन GSLV-D1 चे श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण
18 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष
1774 : सवाई माधवराव पेशवा – यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म. (मृत्यू: 27 ऑक्टोबर 1795)
1858 : ‘महर्षी धोंडो केशव कर्वे’ – स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 9 नोव्हेंबर 1962 – मुरुड)
1916 : ‘ललिता पवार’ – हिंदी व मराठीतील चरित्र अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 24 फेब्रुवारी 1998)
1958 : ‘माल्कम मार्शल’ – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू: 4 नोव्हेंबर 1999)
1962 : ‘पूनम धिल्लन’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
1991 : ‘डॉ. वृषाली करी’ – यांचा जन्म.
18 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष
1859 : स्वातंत्रवीर सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे यांचे निधन.
1898 : महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी ‘दामोदर हरी चापेकर’यांना फाशीची शिक्षा. (जन्म: 24 जून 1869)
1945 : ‘जॉन एम्ब्रोस फ्लेमिंग’ – व्हॅक्यूम ट्यूब चे शोधक यांचे निधन. (जन्म: 29 नोव्हेंबर 1849)
1955 : ‘अल्बर्ट आइनस्टाइन’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
1966 : ‘जगन्नाथ गणेश गुणे’ तथा स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ यांचे निधन. (जन्म: 30 ऑगस्ट 1883)
1972 : ‘डॉ. पांडुरंग वामन काणे’ – विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, भारतरत्न यांचे निधन. (जन्म: 7 मे 1880)
1995 : धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते – पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक पंडित यांचे निधन.
1999 : ‘रघुवीर सिंह’ – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार यांचे निधन. (जन्म: 22 ऑक्टोबर 1942)
2002 : ‘शरद दिघे’ – महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष यांचे निधन.
2002 : नॉर्वेजियन दर्यावर्दी संशोधक थोर हेअरडल यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1914)






