मृत्युंजय कादंबरी लिहिलेले लेखक शिवाजी सावंत यांचा मृत्यू झाला (फोटो - टीम नवराष्ट्र)
मराठी साहित्य विश्वामध्ये मृत्युंजयकार म्हणून ओळख असलेले शिवाजी सावंत यांनी त्यांच्या लेखनाने उत्कृष्ट साहित्यनिर्मिती केली. थेट कुरुक्षेत्रामध्ये मुक्काम करुन त्यांनी मृत्युंजय ही कादंबरी साकारली. प्रदीर्घ संशोधन, चिंतन आणि मनन यांतून रससंपन्न साहित्य लिहिले. ’मृत्युंजय’नंतर सावंतांनी ’छावा’ ही ऐतिहासिक व ’युगंधर’ ही पौराणिक विषयावरची कादंबरी लिहिली. त्यांच्या अनेक पुस्तकांचे इतर भाषांमध्ये भाषांतर देखील झाले आहे. आजच्या दिवशी 2002 साली त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या पुस्तकरुपी लेखणीतून शिवाजी सावंत हे कायम वाचकाच्या मनात जिवंत राहिले आहेत.
18 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
18 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
18 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष