• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Navratri Special Article On Women Respect Self Respect And Security In The Society Navratri 2024

‘ती’चा सन्मान फक्त 9 दिवस? विचारांची अस्पृश्यता आजही कायम, शक्तीचे रूप दाखविण्याची गरज

नवरात्रीमध्ये स्त्री शक्तीची आराधना केली जाते. तिच्या शक्तीची कौतुके गायली जातात. पण त्यानंतर शक्तीरुपी स्त्रीच्या अस्तित्वाचे काय? नवरात्रीनंतर तिच्या सन्मानाचे, आत्मसन्माचे काय? सुरक्षेचा काय? असा अनेक मुद्द्यांना प्रकाशझोतात आणणारा हा लेख

  • By प्रीति माने
Updated On: Oct 09, 2024 | 04:01 PM
Navratri special article on women respect

नवरात्रीमध्ये स्त्री शक्तीची आराधना केली जाते. पण त्यानंतर तिच्या सन्मानाचे आणि सुरक्षेचे काय? (फोटो - istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रिती माने –  देशभरामध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. बंगालमधील नवरात्र ही परंपरेचा सांगड घालणारी आहे तर गुजरातमधील नवरात्र ही गरबा दांडियामधून उत्सवाचा जल्लोष दाखवणारी आहे. महाराष्ट्रातील शक्तीपीठ आदिशक्तीची रुप दाखवणारी आहे. त्या त्या राज्यांची नवरात्र ही वेगळेपणा जपणारी आहे. यामध्ये एका गोष्टीचे मात्र साम्य आहे, ती म्हणजे आराधना. स्त्री शक्तीची..भक्तीची…तिच्या प्रीतीची ही उपासना कृतज्ञता दर्शवणारी आहे. सर्जनशीलता आणि उत्पत्तीचे स्थान असलेल्या ‘ती’ला सन्मान देण्याचा हा एक उत्सव आहे. मात्र या नऊ दिवसांच्या उत्सवानंतर काय? त्यानंतर ‘ती’चा हा सन्मान ही कृतज्ञता  जाते कुठे? आजही तिच्याबाबत असणारी दुय्यम स्थानाची भावना समाजामध्ये रेंगाळते आहे. आणि ही फक्त रेंगाळत नाही तर वाळवीसारखी समाजाला पोखरते आहे.

आपला समाज हा पुरुषप्रधान मानला जातो. पण मी ही सृष्टी सृजनशील स्त्रीच्या हाती आहे, असे मानते. कारण ही स्त्रीरुपी धरणी आणि प्रत्येक स्त्री एक स्वशक्ती सांभाळून अस्तित्व दाखवून देते. तिच्यामध्ये असणारी सृजनशीलता आणि सहनशक्ती हे बळ आपसूकच तिला ‘आदिशक्ती’ बनवते. तिच्या उदरी ती चुका सामावून घेते. पण तिला सहनशक्ती आजच्या या पुरुषप्रधान समाजात आणखीच वाढवावी लागते आहे. बळकट करावी लागते आहे. याचे कारण म्हणजे तिला दिली जाणारी वागणूक…दुय्यमता आणि अस्पृश्यता.

देवघरांमध्ये लक्ष्मीला अगदी कुबेराच्या शेजारी बसवून पुजले जाते. घरच्या लक्ष्मीला मात्र घरात निर्णयाचा, मतं मांडण्याचा अधिकार सुद्धा दिला जात नाही. तिला मत मांडू दिले जात नाही आणि मांडलेच तर ग्राह्य धरले जात नाही. घरचा उंबरठा दिला लक्ष्मणरेषा वाटू लागतो. त्या बाहेरचे जग तिला काळ्या पोकळीप्रमाणे अंधारे वाटू लागते. आणि घरातही तिची घसुमट होते. यामुळे तिच्या मनात पोकळी निर्माण होते ती कायमची. हा वारसा मागील अनेक पिढ्यानंपिढ्या पुढे अजाणता दिला जातो आहे. तिची इच्छाशक्ती मारुन एकप्रकारे तिचे पंख छाटले जात आहेत. तिला मत मांडून न दिल्याने एकप्रकारे तिची वाचा काढून घेतली जाते आहे. तिला निर्णय न घेऊ दिल्यामुळे तिच्या सद्सद्विवेकबुद्धीवर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तिच्याबाबत असणारी विचारांनी असणारी अस्पृश्यता आजही आपल्याला दररोज अगदी सहज दिसून येते. तिला याची जाणीव देखील अनेकदा नसते इतके ते तिच्या अंगवळणी पडले आहे.

आजही बंधनं मोडून आणि घराचे उंबरठे ओलांडून आपले विश्व निर्माण करणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत. पण समाजामध्ये आजही स्त्रिया सुरक्षित नाही. ती लहान तान्हुली असो…किशोरवयीन असो…तरुणी असो…आई असो…आज्जी असो…नराधमांसमोर कोणीही सुरक्षित नाही. घर असो वा दार असो…शाळा असो वा ऑफिस असो… कुठेही ती सुरक्षित नाही. आजच्या जगामध्ये आपाल्यालाच दुर्गा म्हणून उभे राहावे लागणार आहे. व्यभिचारी राक्षसाला ठेचून स्वरक्षाणार्थ शक्तीचे रुप घ्यावे लागणार आहे. यासाठी स्त्रीयांनी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.

Web Title: Navratri special article on women respect self respect and security in the society navratri 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 04:00 PM

Topics:  

  • Navratri
  • Navratri festival

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

Vastu Tips: देव्हाऱ्यामध्ये दिवे, अगरबत्ती आणि फुले ठेवण्यासाठी काय आहेत नियम आणि उपाय

Vastu Tips: देव्हाऱ्यामध्ये दिवे, अगरबत्ती आणि फुले ठेवण्यासाठी काय आहेत नियम आणि उपाय

विक्रम सोलर IPO चे सबस्क्रिप्शन दुसऱ्या दिवशी वाढले, नवीनतम GMP, ब्रोकरेज हाऊसचा सल्ला आणि इतर तपशील तपासा

विक्रम सोलर IPO चे सबस्क्रिप्शन दुसऱ्या दिवशी वाढले, नवीनतम GMP, ब्रोकरेज हाऊसचा सल्ला आणि इतर तपशील तपासा

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

माजी पाकिस्तानी दिग्गज गोलंदाज अडचणीत: Wasim Akram वर ‘हे’ आहेत गंभीर आरोप, तक्रार दाखल

माजी पाकिस्तानी दिग्गज गोलंदाज अडचणीत: Wasim Akram वर ‘हे’ आहेत गंभीर आरोप, तक्रार दाखल

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.