स्वामी विवेकानंद
बदलत्या काळानुसार शिक्षणाला खूप महत्व आले आहे. शिक्षण घेतल्याने व्यक्तीला बऱ्याच गोष्टींचे ज्ञान प्राप्त होत जाते.आजच्या युगात जीवन जगण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. 04 जुलै ला दरवर्षी स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी असते. स्वामी विवेकानंद यांनी जगाला शिक्षणाचा खरा अर्थ सांगितला. जगभरातील सर्वच लोक स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित झाली आहेत. त्यांना जीवन जगण्याचा खरा अर्थ सापडला आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त काही खास गोष्टी सांगणार आहोत, त्या नक्की वाचा.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथील कायस्थ कुटुंबामध्ये झाला होता. त्यांचे बालपणीचे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. विवेकानंदांचे वडील विश्वनाथ दत्त कलकत्ता उच्च न्यायालयाचे वकील होते, तर आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक विचारांच्या होत्या.लहानपणापासूनच अभ्यासाची आवड असल्याने नरेंद्रनाथ दत्त खूप हुशार होते. 1871 मध्ये वयाच्या 8 व्या वर्षी त्यांना शाळेत घालण्यात आले. त्यानंतर त्यांनी 1879 मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजच्या प्रवेश परीक्षेमध्ये पहिला क्रमांक काढला होता. त्यानंतर त्यांनी वयाच्या २५ वर्षी सर्व गोष्टींचा त्याग करून सन्यास घेतला.
स्वामी विवेकानंद यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त असे आहे. ते विविदिशानंद असे आपले नाव लिहायचे. त्यानंतर स्वामीजींनी अजित सिहं यांना विचारले तुंम्हाला कोणते नाव आवडले? तेव्हा ते म्हणाले विवेकानंद. त्यानंतर नरेंद्रनाथ दत्त यांना स्वामी विवेकानंद या नावाने ओळखू लागले. एक दिवशी त्यांना शिकागो येथील धार्मिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आले. त्यावेळी त्यांनी राजा अजित सिंह यांनी सादर केलेला राजस्थानी स्कार्फ, झगा आणि कमरपट्टा परिधान केला होता. त्यानंतर राजा अजित सिंह यांनी विवेकानंदांचे मुंबई ते अमेरिकेपर्यंत विमान तिकीट काढले होते. 31 मे 1893 रोजी स्वामीजी जहाजाने शिकागोला जाण्यासाठी निघाले.