फोटो सौजन्य – ICC
2024 मध्ये झालेल्या t20 विश्वचषकामध्ये भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विश्वचषक जिंकला होता. पुढील t20 विश्वचषक हा 2026 मध्ये खेळवला जाणार आहे हा विश्वचषक भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये होणार आहे. भारताच्या संघाने मागील काही वर्षांमध्ये t20 मध्ये चांगले कामगिरी केली आहे , सध्या भारतीय t20 संघाचे कर्णधारपद हे सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी t20 जिंकल्यानंतर t20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
भारत आणि श्रीलंका हे दोन संघ विश्वचषकाचे आयोजन करणार आहे त्यामुळे या दोन संघांचे स्थान ते विश्वचषकामध्ये पक्के झाले आहे. याव्यतिरिक्त आता असा एक संघ आहे जो विश्वचषकामध्ये पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहे. अमेरिका विरुद्ध कॅनडा यांच्यामध्ये सध्या क्वालिफायरचा सामना सुरू होता. यामध्ये कॅनडाच्या संघाने अमेरिकेला पराभूत करून विश्वचषकांमध्ये स्थान पक्के केले आहे. कॅनडाच्या संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करून विश्वचषकामध्ये स्थान पक्के केले आहे.
अमेरिका क्वालिफायरमध्ये बहामासला हरवून कॅनडाने पहिल्यांदाच विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. या सामन्यात कॅनडाने शानदार गोलंदाजी केली आणि बहामासला फक्त 57 धावांत गुंडाळले. कॅनडाकडून गोलंदाजी करताना कलीम सना आणि शिवम शर्मा यांनी 3-3 विकेट घेतल्या. त्यानंतर कॅनडाने 5.3 षटकांत हे लक्ष्य गाठले. कॅनडाकडून फलंदाजी करताना दिलप्रीत बाजवाने 14 चेंडूत 36 धावांची नाबाद खेळी केली.
The road to ICC Men’s #T20WorldCup 2026 is heating up with 13 teams now locked in 🔥
— ICC (@ICC) June 22, 2025
कॅनेडियन संघाने अमेरिका पात्रता फेरीत खूप चांगली कामगिरी केली. निकोलस किर्टन यांच्या नेतृत्वाखाली, कॅनडाने प्रादेशिक अंतिम फेरीत त्यांचे पाचही सामने जिंकले. या काळात कॅनडाने चमकदार कामगिरी करत बर्म्युडा, केमन आयलंड आणि बहामास यांना एकामागून एक हरवले.
२० पैकी १३ संघ २०२६ च्या आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. ज्यामध्ये भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, बांगलादेश, वेस्ट इंडिज, अमेरिका, आयर्लंड आणि कॅनडा यांचा समावेश आहे.