फोटो सौजन्य - WHITE FERNS
सोफी डिव्हाईन निवृती : महिला एकदिवसीय विश्वचषकाला लवकरच सुरुवात होणार आहे. या विश्वचषकामध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये 27 साखळी सामने खेळवले जाणार आहेत तर दोन सेमीफायनल सामने होणार आहेत आणि फायनलचा सामना हा 2 नोव्हेंबर 2025 रोजी खेळवल्या जाणार आहे. प्रत्येक संघातील सात सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेमध्ये भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलियन, न्यूझीलंड, बांगलादेश, पाकिस्तान, इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका हे संघ सहभागी होणार आहेत. हे सामने भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये होणार आहेत.
पहिला सामना हा 30 सप्टेंबर 2025 रोजी खेळवला जाणार आहे. आता यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आले आहे न्यूझीलंडची कर्णधार दिग्गज सोफी डिव्हाईन तिने आता ती निवृत्ती कधी घेणार या संदर्भात मोठा खुलासा केला आहे. न्युझीलँड महिला एकदिवसीय संघाची कर्णधार सोफी डिव्हाईनने यावर्षी आयसीसी क्रिकेटमधून ती निवृत्ती घेणार आहे याची घोषणा तिने केली आहे. जागतिक स्तरावर महिला क्रिकेटमधील सर्वात अष्टपैलू म्हणून ओळखली जाणारी सोफी डिव्हाईन हिने तिच्या करिअरमध्ये आत्तापर्यंत एकदिवसीय प्रवासमध्ये 3990 धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर 9 आंतरराष्ट्रीय शतक हे देखील तिने ठोकले आहेत एवढेच नव्हे तर 107 विकेट्स आहे तिच्या नावावर आहे. भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत निवृत्ती घेण्याची योग्य वेळ आहे असे खेळाडूंना सांगितले आहे. सोफी डिव्हाईन म्हणाली की, माझं क्रिकेटपासून दूर जाण्याची हीच वेळ मला वाटते.
News | ODI captain Sophie Devine will retire from one day internationals at the conclusion of the 2025 ICC Women’s Cricket World Cup, and will therefore opt for a casual playing agreement for the 2025-26 season. Story | https://t.co/hpx54eBwqd 📰 pic.twitter.com/9TimJQKXNj — WHITE FERNS (@WHITE_FERNS) June 16, 2025
पुढे ती म्हणाली की, मी अजुनही संघाचा भाग आहे आणि मला न्युझीलंड क्रिकेटचा पाठिंबा मिळाल्यामुळे मी भाग्यवान आहे. मी निघून जाण्याआधी या संघाला शक्य तितके सर्व काही देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे, या तरुण गटाची वाटचाल पाहून मी खरोखरच उत्साहित आहे आणि पुढील सहा ते नऊ महिन्यामध्ये जेवढा वेळ मी खेळणार आहे, त्यामध्ये माझी भूमिका बजावण्यास मी उत्सुक आहे.”






