स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालच्या (Rafael Nadal) घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. नदालची पत्नी मारिया फ्रान्सिस्का पेरेलोनं (मारिया फ्रान्सिस्का पेरेलोनं ) शनिवारी बाळाला जन्म दिला. राफेल नदाल आणि पत्नी मारिया यांचे हे पहिलेच अपत्य असून त्यांच्या पोटी एका गोंडस बाळाने जन्म दिला आहे.
जुलै महिन्यात स्टार टेनिसपटू राफेल नदालने तो लवकरच बाबा होणार आहे याची माहिती चाहत्यांना दिली होती. नदाल वडील झाल्याची माहिती स्पॅनिश फुटबॉल क्लब रिअल माद्रिदनं दिली आहे. ही आनंदाची बातमी समोर आल्यापासून जगभरातील चाहते नदालवर अभिनंदन आणि शुभेच्छाचा वर्षाव करीत आहे. राफेल नदालनं २०१९ मध्ये त्याची गर्लफ्रेंड मारियाशी लग्न केलं. दोघे ही २००५ पासून एकमेकांना डेट करत होते. नदालनं १४ वर्षांच्या नात्याचं लग्नात रूपांतर केलं. टेनिसपटू राफेल नदालने त्याच्या कारकिर्दीत टेनिसमध्ये तब्बल २२ ग्रँडस्लॅम पटकावले आहेत.
स्पॅनिश फुटबॉल क्लब रिअल माद्रिदनं ट्विट करून नदाल आणि त्याच्या पत्नीचे अभिनंदन केले आहे. रिअल माद्रिदनंच्या ट्विटमध्ये असं लिहलंय की, “आमचे प्रिय सदस्य राफेल नदाल आणि मारिया पेरेलो यांना त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्माबद्दल अभिनंदन. या आनंदाच्या क्षणात आम्ही तुमच्यासोबत आहोत. हार्दिक शुभेच्छा.”
Congratulations to our dear honorary member @RafaelNadal and to María Perelló for the birth of their first child. We join you in sharing the happiness of this moment. All the best! — Real Madrid C.F. ???? (@realmadriden) October 8, 2022






