फोटो सौजन्य - BCCI
भारताच्या महिला क्रिकेट संघाचे कसोटी सामने सुरु आहेत. यामध्ये टीम इंडियाच्या महिला क्रिकेट खेळाडू दक्षिण आफ्रिकेशी सामना करत आहेत. भारताच्या संघाने काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय कसोटी महिला ३-० ने जिंकली आहे. भारताचा महिला क्रिकेट संघ हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय कामगिरी करत आहे. आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियम रंगला आहे.
यामध्ये पहिल्याच दिवशी भारताच्या सलामी फलंदाज शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना आणि दोघीनी शतक ठोकले आहेत. यामध्ये भारताची स्मृती मानधनाने १४७ चेंडूंमध्ये १२६ धावा केल्या आहेत तर शेफाली वर्माने १३८ चेंडूंमध्ये १२० धावा करत दुसरे शतक ठोकले आहे. या सामन्यात या दोघीनी साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजाला प्रचंड त्रास दिला. स्मृती मानधनाने १४९ धावा करून ती आऊट झाली आहे. लवकरच भारताचा संघ तीनशेचा आकडा ओलांडेल आणि साऊथ आफ्रिकेसाठी ते नक्कीच डोक्याचं होणार आहे. सतीश शुभा ही स्मृती मानधना बाद झाल्यावर फलंदाजीसाठी आली आहे.
या मालिकेत तीन कसोटी सामने रंगणार आहेत. यामध्ये आज पहिल्या कसोटी सामन्याचा श्रीगणेशा झालेला आहे. चेन्नईत खेळल्या जाणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडिया चांगलीच मजबूत स्थितीत आहे. या दोन्ही सलामीवीरांमध्ये २०० हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी आपापली शतके पूर्ण केली आहेत. शेफालीने १५२ चेंडूत १८ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण करून १४३ धावा केल्या आहेत.
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या कसोटी सामन्यात भारताची सलामीची फलंदाज शेफाली वर्माने आश्चर्यकारक कामगिरी करत द्विशतक झळकावले. शेफालीने १९४ चेंडूंमध्ये द्विशतक पूर्ण केले आहे. आपल्या द्विशतकादरम्यान त्याने 8 षटकार आणि 22 चौकार मारले. शेफालीचे कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील हे पहिले द्विशतक होते.शेफालीने २२ वर्षांनंतर महिला कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी द्विशतक झळकावण्याचा चमत्कार केला. तिच्या आधी मिताली राजने २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध हा पराक्रम केला होता आणि २१४ धावांची इनिंग खेळली होती.






