अभिषेक कुमार दलहोर केकेआरच्या संघात दाखल (फोटो - सोशल मिडिया)
Abhishek Kumar Dalhor: सध्या आयपीएलचा 18 वा हंगाम सुरू आहे. 24 सामने आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. दरम्यान या स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र सध्या केकेआर संघासाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. केकेआरच्या ताफ्यात नेट बॉलर म्हणून अभिषेक कुमार दलहोरची एंट्री झाली आहे.
अभिषेकची ओळख स्ट्रीट टेनिस क्रिकेटमधील चांगला खेळाडू अशी आहे. यंदाच्या हंगामात केकेआरला चांगली खेळी करता आलेली नाही. केकेआरने आतापर्यंत एकूण 5 सामने खेळले आहेत. त्यापइकी केकेआर केवळ दोनच सामने जिंकू शकली आहे. आता अशातच अभिषेक कुमार दलहोरची एंट्री केकेआरच्या संघात झाली आहे.
अभिषेक कुमार दलहोर हा मुंबईचा खेळाडू आहे. अभिषेक नेट बॉलर म्हणून केकेआरच्या संघात दाखल झाला आहे. आयएसपीएलमधील सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणून अभिषेकची ओळख आहे. अशा जबरदस्त ऑल राऊंडरची संघात एंट्री झाली आहे. या खेळाडूला आयपीएलमध्ये संधि मिळाली आहे. त्याने 19 सामन्यांमध्ये 33 बळी आणि 324 धावा केल्या आहेत.
बॉलीवूड स्टार, प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन हे माहीम मुंबई संघाचे मालक आहेत. आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्सने निवडलेल्या माझ्या मुंबई संघातील खेळाडू अभिषेक दलहोर याचे हार्दिक अभिनंदन, असे अमिताभ बच्चन म्हणाले आहेत.
कोलकाताला घरच्या मैदानावर लखनऊने ४ धावांनी केलं पराभूत
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला घरच्या मैदानावर लखनऊ सुपर जायंट्स पाणी पाजलं आहे. कोलकाता नाईट राइडर्सला लखनौ सुपर जायंट्सला ४ धावांनी पराभूत केले आहे. केकेआरचा हा या स्पर्धेचा या विजयासह तिसरा पराभव आहे तर लखनऊचा हा या स्पर्धेचा तिसरा विजय आहे. आजच्या सामन्यांमध्ये लखनौच्या फलंदाजांनी धुव्वादार फलंदाजी केली होती पण गोलंदाज विशेष कामगिरी करू शकले नाही आणि त्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
कोलकाता नाईट रायडर्ससाठी क्विंटन डी कॉकने संघासाठी नऊ चेंडूंमध्ये 15 धावा केल्या. तर सुनील नारायणने संघासाठी 13 चेंडूंमध्ये तीस धावा केल्या, यामध्ये त्याने २ षटकार आणि ४ चौकार मारले. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने ३५ चेंडूमध्ये ६१ धावा केल्या. यामध्ये त्याने २ षटकार आणि ८ चौकार मारले. रिंकू सिंहने १५ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या तर वेंकटेश अय्यरने संघासाठी महत्वाची ४५ धावांची खेळी खेळली.
लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांबद्दल सांगायचे झाले तर लखनौ सुपर जायंट्सने अॅडम मार्कराम आणि मिशेल मार्श यांनी दमदार सुरुवात करून दिली. मार्कराम आणि मार्श यांनी पहिल्या विकेटसाठी १०.२ षटकांत ९९ धावा जोडल्या. मार्करामने २८ चेंडूत ४७ धावा फटकावल्या, तर मार्शने ४८ चेंडूत ८१ धावांची तुफानी खेळी केली. मार्कराम पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर निकोलस पूरन क्रीजवर आला. तो येताच, पूरनने बॅटने कहर करायला सुरुवात केली. केकेआरचा गोलंदाजी हल्ला पूरनसमोर विनोदासारखा वाटत होता. पूरनने फक्त २१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पूरनने ३६ चेंडूंच्या खेळीत कहर केला. लखनौच्या या फलंदाजाने नाबाद ८७ धावा करताना ७ चौकार आणि ८ उत्तुंग षटकार मारले.