Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhishek Sharma ची दिल्ली हायकोर्टात धाव; परवानगीशिवाय नाव-फोटो वापरल्याने वाद, ॲमेझॉन-फ्लिपकार्ट अडचणीत

Delhi High Court Summons In Abhishek Sharma's Personality Rights Suit case: अभिषेक शर्माने त्याची बदनामी करणारी सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि लिंक काढून टाकण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आता न्यायालयाने समन्स जारी केले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 09, 2026 | 03:17 PM
Abhishek Sharma ची दिल्ली हायकोर्टात धाव; परवानगीशिवाय नाव-फोटो वापरल्याने वाद, ॲमेझॉन-फ्लिपकार्ट अडचणीत
Follow Us
Follow Us:
  • Abhishek Sharma ची दिल्ली हायकोर्टात धाव
  • आक्षेपार्ह पोस्ट- लिंक हटवण्यासाठी दाखल केली याचिका
  • न्यायालयाने जारी केले समन्स
भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक सलामीवीर फंलदाज अभिषेक शर्मा सध्या इंग्लंड दौऱ्यावर सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळत आहे. अभिषेकने त्याच्याबद्दलच्या आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट हटवण्याची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात शर्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने, अद्याप न हटवलेल्या URLs ची माहिती देत एक अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यावर न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी सांगितले की, अभिषेक शर्माच्या व्यक्तिमत्व हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्याच्या खटल्यात अंतरिम आदेश जारी करतील.

मालिका आणि अब्रू दोन्ही पणाला! श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाला लागला पराभवाचा शाप? ‘या’ लाजिरवाण्या आकड्यांनी वाढवली चिंता

न्यायालयाने जारी केले समन्स

अभिषेक शर्मा यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने सांगितले की, अद्याप न हटवण्यात आलेल्या URL युआरएलचा तपशील देणारे एक अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. शर्मा यांच्या वकिलाने सांगितले की, काही पोस्ट आधीच काढण्यात आल्या असल्या तरी, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील दोन पोस्ट आणि आणखी एक पोस्ट, ज्यात अपमानास्पद भाषा होती, त्या अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत.

ते पुढे म्हणाले की, ‘फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनने अभिषेक शर्मा यांचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय व्यावसायिक कारणांसाठी वापरला आहे, जो हटवण्यात आला पाहिजे.’ मेटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने सांगितले की, दोन्ही सोशल मीडिया पोस्ट काढल्या जातील, तर ॲमेझॉनच्या वकिलाने सांगितले की, ते न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतील आणि अभिषेक शर्मा यांचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरणाऱ्या युआरएल काढून टाकतील.

दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले की, ‘क्रिकेटपटू अभिषेक शर्माच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि प्रतिमेचा गैरवापर करणाऱ्या अनेक आक्षेपार्ह पोस्ट आणि लिंक्स हटवण्याचे निर्देश देणारा अंतरिम आदेश जारी केला जाईल.’

अभिषेकने याचिकेत काय मागणी केली ?

दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या याचिकेत, अभिषेक शर्माने आपल्या व्यक्तिमत्व हक्कांच्या संरक्षणाची मागणी केली आहे. तसेच, त्याला बदनाम करण्यासाठी तयार करण्यात आलेली कथित आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित सामग्री काढून टाकण्याची मागणीही त्याने केली आहे.

चौथ्या टी२० सामन्यात सर्वांचे अभिषेकवर असेल लक्ष

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत अभिषेक शर्माची बॅट चांगलीच तळपली आहे, पण त्याला अद्याप मोठा स्कोअर करता आला नाही. आता टीम इंडियाकडे ही मालिका अनिर्णित राखण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यामुळे चौथ्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्माची कामगिरी निर्णायक ठरेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेचा चौथा सामना ब्रिस्टल येथील काउंटी ग्राऊंडवर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १०:०० वाजता सुरू होईल.

IND vs ENG : तिलक वर्मा OUT, संजू सॅमसन IN? मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाची अग्निपरीक्षा; पाहा पिच रिपोर्ट आणि संभाव्य Playing XI

Web Title: Abhishek sharma delhi high court petition summons name photo misuse amazon flipkart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • delhi high court
  • IND Vs ENG
  • Social Media

संबंधित बातम्या

Social Media वर कमी फॉलोअर्स असूनही करते बक्कळ कमाई? जाणून घ्या २३ वर्षीय इन्फ्लुएंसरची भन्नाट आयडिया
1

Social Media वर कमी फॉलोअर्स असूनही करते बक्कळ कमाई? जाणून घ्या २३ वर्षीय इन्फ्लुएंसरची भन्नाट आयडिया

Life Lessons: आयुष्याचा खरा अर्थ काय? स्वतःला हे प्रश्न विचाराल, तर जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल
2

Life Lessons: आयुष्याचा खरा अर्थ काय? स्वतःला हे प्रश्न विचाराल, तर जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल

धक्कादायक प्रकार; भररस्त्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची गोळ्या झाडून हत्या; हत्येची जबाबदारी घेणारी पोस्ट व्हायरल
3

धक्कादायक प्रकार; भररस्त्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची गोळ्या झाडून हत्या; हत्येची जबाबदारी घेणारी पोस्ट व्हायरल

IND vs PAK: वैभवला आऊट केल्यानंतर अभिषेक शर्माने घेतला बदला, 7 सिक्सर्स मारत केले रेकॉर्ड्स
4

IND vs PAK: वैभवला आऊट केल्यानंतर अभिषेक शर्माने घेतला बदला, 7 सिक्सर्स मारत केले रेकॉर्ड्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.