अभिषेक शर्माकडे पंड्याचा रेकॉर्ड मोडण्याची संधी (फोटो - ians)
इंग्लंडविरुद्ध अभिषेक शर्माचा रेकॉर्ड चांगला असल्याचे पाहायला मिळतो. तो या सिरिजमध्ये देखील आपला रेकॉर्ड कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. या सिरिजमध्ये अभिषेक शर्माकडे हार्दिक पंड्याचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे. त्याच्याकडे इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.
भारतीय फलंदाजांचा इंग्लंडविरुद्ध चांगला रेकॉर्ड पाहायला मिळत आहे. अभिषेक शर्मा आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध एकूण 6 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने एकूण 288 रन्स केल्या आहेत. या सामन्यांमध्ये अभिषेक शर्माने एक शतक तर एक अर्धशतक लगावले आहे. अभिषेक शर्माने इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत 22 सिक्स मारले आहेत. तर हार्दिक पंड्याने इंग्लंडविरुद्ध 27 सिक्स मारले आहेत.
IND Vs ENG Live: ‘या’ एका कारणामुळे रद्द होणार भारत-इंग्लंड सामना? धाकधूक वाढली, विषय काय?
अभिषेक शर्माकडे हार्दिक पंड्याचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे. हार्दिक पंड्याचा रेकॉर्ड मोडण्यासाठी अभिषेक शर्माला केवळ 6 सिक्स मारण्याची गरज आहे. तसे करताच इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड अभिषेक शर्माच्या नावावर होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात आज भारत इंग्लंडविरुद्ध खेळण्यासाठी उतरणार आहे.
चेस्टर-ले-स्ट्रीट स्टेडियमवर आजचा भारत विरुद्ध इंग्लंड सामना होणार आहे. 5 टी 20 सामन्यांमधील पहिला सामना आज खेळवला जाणार आहे. दरम्यान सामना सुरू होण्याआधी या भागात 40 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर थोडा पाऊस कमी होऊ शकतो . मात्र रात्री 8 नंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
IND Vs ENG: वैभव सूर्यवंशीला न्याय मिळणार? श्रेयस अय्यरने एका वाक्यात संपवला विषय, म्हणाला…
पीच रिपोर्ट
चेस्टर-ले-स्ट्रीट स्टेडियमच्या पीच रिपोर्टविषयी बोलायचे झाल्यास या ठिकाणी गोलंदाजांना जास्त मदत मिळते. या इंटरनॅशनल स्टेडियमवर तब्बल 8 सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये केवळ 3 संघ प्रथम फलंदाजी करताना जिंकले आहेत. या स्टेडियमवर सर्वाधिक स्कोअर हा 135 ते 140 रन्सचा आहे.






