एम एस धोनी(फोटो -सोशल मीडिया)
Mohit Sharma on MS Dhoni : भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला त्याच्या शांत स्वभावसाठी ओळखला जातो. त्याचमुळे त्याला कॅप्टन कूल असे देखील म्हणून ओळखतात. परंतु अनेक वेळा असे दिसून आले आहे की, तो मैदानावर असताना त्याचा राग अनावर झालेला आहे. अशाच आता वेगवान गोलंदाज मोहित शर्माने एम एस धोनीबाबत खुलासा केला आहे. मोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्जकडून धोनीसोबत खेळलेला आहे. चेन्नईकडून चार वर्षे खेळणाऱ्या मोहितने धोनी त्याच्यावर रागावल्याचा एक किस्सा सांगितला आहे. ही घटना चॅम्पियन्स लीग दरम्यान घडली आहे.
हेही वाचा : PAK vs IND : ‘नॉन-स्ट्राइक एंडवर उभा तुमचा बाप..’, वीरेंद्र सेहवागची पाकिस्तानविरुद्ध अविस्मरणीय फलंदाजी
एका वेबसाइटशी बोलत असताना मोहित शर्माने सांगितले की, “ही घटना आयपीएलच्या केकेआर विरुद्ध खेळलेल्या सामन्यादरम्यान घडली आहे. त्यानंतर माही भाईने ईश्वर पांडेला गोलंदाजीसाठी बोलवून घेतले. पण मला वाटले की त्याने मला कॉल केला असेल. तो म्हणाला, ‘मी धावायला सुरुवात केली,असताना माही भाई म्हणाले की त्यांनी मला बोलावले नाही आणि ईश्वरला हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण पंच म्हणाले की मला गोलंदाजी सुरू करावी लागणार आहे, कारण मी माझ्या रन-अपवर धावायला सुरुवात केली होती. यावर तो रागावला आणि मला शिवीगाळ देखील केली.”
मोहित शर्मा पुदहेन म्हणाला की, “मी त्याच षटकात एक बळी घेतल्यानंतर देखील धोनी मला शिवीगाळ करत राहिला होता. मी पहिल्याच चेंडूवर युसूफ पठाणनला बाद केले होते. पण विकेटचा आनंद साजरा करताना देखील माही भाई मला शिवीगाळ करत राहिला होता.” अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित म्हणाला की, “माझ्यासोबत असे अनेक क्षण आले आहेत जेव्हा तो आपला राग गमावून बसतो. तो शांत राहतो आणि तुम्ही त्याच्याकडून राग गमावण्याची अपेक्षा देखील करत नसतात. जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तो आपला राग गमावत असतो, तेव्हा तुम्हाला थोडा उत्साह येतो.’
हरियाणाकडून घरगुती क्रिकेट खेळणारा मोहित शर्मा २०१३ ते २०१५ दरम्यान धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. त्याने संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आणि ४७ सामन्यांमध्ये ५७ बळी टिपले आहेत. तो २०१४ च्या आवृत्तीत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज देखील ठरला होता.