मुशीर खान अंडर-19 विश्वचषकात सतत चमत्कार करताना दिसत आहे. त्याने स्पर्धेतील दुसरे शतक झळकावले. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात मुशीरने आपले दुसरे शतक झळकावले आहे. या शतकासह, मुशीर अंडर-19 विश्वचषकात दोन शतके झळकावणारा शिखर धवननंतरचा दुसरा भारतीय ठरला. याआधी मुशीरने आयर्लंडविरुद्ध शतक झळकावले होते.
या शतकापूर्वी मुशीरने अमेरिकेविरुद्ध खेळलेल्या डावात अर्धशतक झळकावले होते. अमेरिकेविरुद्ध मुशीरने 76 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने ७३ धावांची खेळी केली. त्याआधी आयर्लंडविरुद्ध मुशीरने 106 चेंडूंत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 118 धावा केल्या होत्या.
न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर मुशीरने किवी गोलंदाजांवर मात केली. या शतकासह मुशीर या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
मुंबईकडून खेळणाऱ्या मुशीरने आतापर्यंत केवळ तीन प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. डिसेंबर 2022 मध्ये त्याने प्रथम श्रेणीत पदार्पण केले. त्याने 3 सामन्यांच्या 5 डावात 96 धावा केल्या. याशिवाय गोलंदाजीत त्याने 2 बळी घेतले.
मोठा भाऊ सरफराज खान भारताचा भाग
एकीकडे लहान भाऊ अंडर-19 विश्वचषकात धुमाकूळ घालत आहे, तर दुसरीकडे रणजी स्टार आणि मुशीरचा मोठा भाऊ सफाराज खानचा कसोटीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. खरं तर, या दिवसांत इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात सफराजचा बदली म्हणून समावेश करण्यात आला होता.