फोटो सौजन्य - Saj Sadiq
हरभजन सिंह-कामरान अकमल : विश्वचषकानंतर भारत विरुद्ध पाकिस्तानच (India vs Pakistan) यांच्यामध्ये सामना झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक वाद पेटले होते. यामध्ये चाहत्यांपासून ते दिग्गजांपर्यत सर्वजण वादाच्या इराद्याने सोशल मीडियावर डिवचत होत तर काही त्यांना प्रत्युत्तर देत होते. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु असताना भारताचा गोलंदाज अर्शदीप सिंह यांच्यावर पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमल याने टिपणी केली होती यावर अनेक वाद झाले होते. यावर भारताचा दिग्गज माजी खेळाडू हरभजन सिंहने या टिपणीनंतर कामरान अकमलला सोशल मीडियावर चांगलेच खडसावले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा कामरान अकमल आणि हरभजन सिंह हे आमनेसामने आले आहेत. या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काल भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये बर्मिंगहॅममधील वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये दोघे आमनेसामने आले आणि एकमेकांशी संवाद साधताना दिसले. सामना संपल्यानंतर दोन्ही माजी क्रिकेटपटू वाद घालताना दिसले. दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, हा व्हिडीओ दुरून काढण्यात आल्याने त्यांचे संभाषण ऐकू येत नाही. मात्र, हरभजन त्याच्याशी झालेल्या संवादादरम्यान अकमलला काहीतरी समजावून सांगत असल्याचा भास झाला. मात्र, काय चर्चा झाली याची पुष्टी होऊ शकली नाही.
Kamran Akmal and Harbhajan Singh in deep conversation after the match. Not difficult to guess what they were probably talking about #Cricket #worldchampionshipoflegends pic.twitter.com/3yyx0kZN8t
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) July 6, 2024
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये ९ जून रोजी सामना पार पडला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने हा सामना ६ धावांनी सामना जिंकला. या सामान्यामधील शेवटची ओव्हर अर्शदीप सिंहला देण्यात आली होती. याचवेळी कामरान अकमलने विधान केले होते की, ‘काहीही होऊ शकते, १२ वाजले आहेत. १२ वाजता कोणत्याही शीखला ओव्हर द्यायला नको होती’. यावर भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंह भडकला. हरभजनने सोशल मीडियावर कामरान अकमलला फटकारले. हरभजनने अकमलला सोशल मीडिया साइटवर शिव्या दिल्या, आम्ही शिखांनी त्यांना वाचवले होते, तेही १२ वाजता तुम्हाला लाज वाटली पाहिजे.