नमन धीरची तडाखेबंद खेळी
शेर ए पंजाब टी 20 लीगमध्ये अमृतसर सुरमा संघाकडून नमन धीरने 173 रन्सची आक्रमक खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर अमृतसर सुरमाने 20 ओव्हर्समध्ये 279 रन्स केल्या. टी-२० क्रिकेटमध्ये अशा प्रकारची खेळी करणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. आगामी आयपीएल हंगाम आणि स्थानिक स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर नमन धीरचा हा भन्नाट फॉर्म मुंबई इंडियन्ससह त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी ठरत आहे.
नमन धीरने शेर ए पंजाब टी 20 लीगमध्ये 64 बॉल 173 रन्स ठोकले. या खेळीत त्याने 16 फोर आणि 12 सिक्स मारले. केवळ 37 रन्समध्ये आपले शतक पूर्ण केले. तेव्हा केवळ 12 वी ओव्हर सुरू होती. त्यानंतर त्याने मागे वळून पहिलेच नाही. त्याने 173 रन्सची अत्यंत आक्रमक खेळी केली.
Ajinkya Rahane आता नव्या भूमिकेत! २६ ऑगस्टपासून युरोपच्या ‘या’ लीगमध्ये खेळताना दिसणार
नमन धीरने २०२४ च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून आपले पदार्पण केले होते. पहिल्या मोसमात त्याला केवळ ७ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, आपल्या कौशल्याच्या जोरावर त्याने संघात आपले स्थान पक्के केले. त्यानंतर २०२५ आणि २०२६ च्या हंगामातही तो मुंबई इंडियन्सच्याच संघाकडून मैदानात उतरला.
Asia Cup 2026: रणांगणावर युद्ध पेटणार! Team India समोर कोण असणार? सेमीफायनलमध्ये थेट…
आयपीएल कारकिर्दीत नमन धीरने आतापर्यंत ३७ सामने खेळले असून त्यात ७१० धावांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये त्याच्या नावावर ३ धडाकेबाज अर्धशतकांची नोंद आहे. स्थानिक क्रिकेट आणि टी-२० लीगमध्ये ज्या पद्धतीने तो फलंदाजी करत आहे, ते पाहता आगामी काळात तो मुंबई इंडियन्ससाठी आणि भारतीय क्रिकेटसाठी किती मोठी खेळी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.






