आरसीबीचे नाव बदलले जाणार? (फोटो- ai gemini)
28 मार्चपासून सुरू होणार आयपीएलचा हंगाम
रॉयल चॅलेंजर्स संघाची झाली विक्री
आरसीबीचे नाव बदलले जाणार अशी चर्चा
IPL 2026: या आठवड्यात क्रिकेटचा महाउत्सव सुरू होणार आहे. 28 तारखेपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होणार आहे. मात्र आयपीएल सुरू होण्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाची विक्री झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे मालकी हक्क 17 हजार 700 कोटींमध्ये विकले गेले आहेत. त्यानंतर आता आरसीबीचे नाव बदलले जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आरसीबीच्या संघाचे मालकी हक्क आदित्य बिर्ला ग्रुप, टाइम्स ऑफ इंडिया समहू, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोन या कंपन्यांनी विकत घेतले आहेत. त्यानंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाचे नाव बदलले जाणार अशी चर्चा रंगू लागली आहे. यावर अनन्या बिर्ला यांची सोशल मिडियावरील पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
आर्यमन बिर्ला हे रॉयल चॅलेंजर्स संघाचे नवे चेअरमन असणार आहेत. संघाला नवीन मालक मिळाल्यानंतर आता संघाचे नाव बदलले जाणार अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यातच आता अनन्या बिर्ला यांची सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात नेमके काय आहे ते जाणून घेऊयात.
वादळ घोंघावणार! ‘आयपीएल’आधी Virat Kohli ने दाखवला क्लास; फक्त 12 चेंडूत…; विरोधकांना इशारा
सोशल मिडियावरील पोस्ट काय?
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे मालकी हक्क विकले गेल्यावर संघाचे नाव बदलले जाणार का अशी चर्चा सुरू आहे. मात्र अनन्या बिर्ला यांची सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यांच्या पोस्टनुसार रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे नाव बदलले जाणार नाहीये.
‘आयपीएल’आधी Virat Kohli ने दाखवला क्लास
येत्या आठवड्यापासून म्हणजेच 28 मार्चपासून आयपीएल (Indian Premire Legue) सुरू होणार आहे. 28 मार्च रोजी पहिला सामना गतविजेती रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात होणार आहे. आयपीएल सुरू होण्याआधी आरसीबीच्या खेळाडूंनी जोरदार सराव केला आहे. विराट कोहली आणि जीतेश शर्माने जोरदार खेळी केली आहे.
आयपीएलआधी चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघातर्गत सराव सामना खेळला गेला. यमध्ये प्रमुख खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन केले. त्यामुळे संघासाठी आणि चाहत्यांसाठी ही चांगली बाब असल्याचे म्हटले जात आहे. सराव सामन्यात प्रमुख खेळाडूंची चांगली कामगिरी पाहायला मिळाली.बंगलोरच्या संघाचे विकेटकिपर असणारा जितेश शर्मा याने चांगली कामगिरी केली आहे. सराव सामन्यात त्याने 37 चेंडूत 81 धावांची खेळी केली.






