भारत-पाकिस्तान सामना(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : आशिया कपमध्ये(Asia cup 2025) १४ सप्टेंबर रोजी मोठ्या तणावाच्या वातावरणात भारत-पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्ने पराभव केला. या सामन्यानंतर भारतीय संघाने हस्तांदोलन न करण्यावरून वाद पेटला आहे. भारताकडून झालेला पराभव जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पाकिस्तानी चाहते, तेथील क्रिकेटरसह तज्ज्ञ अस्वस्थ झालेले दिसत आहे. अशातच एका पाकिस्तानी तज्ज्ञाने भारताविरुद्ध विधाने करणाऱ्या त्यांच्याच खेळाडूंनाच फटकारले आहे.
पाकिस्तानी तज्ज्ञ ताहिर गोरा यांनी भारत पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, “भारतावर खेळाला खेळ न मानण्याचा तसेच चित्रात राजकारण आणण्याचा आरोप करण्यात येत आहे. मी पाकिस्तानी खेळाडूंना विचारू इच्छित आहे की, भारताविरुद्ध सामना जिंकतात तेव्हा ते इस्लामचा विजय म्हणून तो साजरा करत असतात. ते खेळात इस्लाम का आणतात?” असा खणखणीत सवाल ताहिर गोरा यांनी विचारला आहे.
हेही वाचा : Asia Cup 2025: ‘भारताने विजेतेपद जिंकल्यास…’, सूर्यकुमार यादव ACC अध्यक्ष मोहसीन नकवीकडून घेणार नाही ट्रॉफी
ताहिर गोरा पुढे म्हणाले की, “अनेक प्रसंगामध्ये पाकिस्तानी खेळाडू आणि नेते वारंवार बोलले आहेत की, भारताविरुद्धचा विजय हा इस्लामचा विजय आहे.” दरम्यान, गोरा यांच्याकडून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानी संघाला प्रोत्साहन देणाऱ्या विधानाचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, “जेव्हा जेव्हा भारताविरुद्ध सामना खेळवण्यात यायचा तेव्हा ते म्हणायचे, ‘भारताविरुद्ध जिंका, इंग्लंडविरुद्ध जिंका, किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंका.'”
गोरा पुढे म्हणाले की, “इंग्लंड हा मुस्लिम देश नाही वा ऑस्ट्रेलिया देखील मुस्लिम देश नाही. तथापि, भारतीय संघामध्ये अनेक मुस्लिम खेळाडू आहेत. शिवाय, भारतामध्ये पाकिस्तानइतकेच मुस्लिम आहेत. जेव्हा ते हा दावा करतात की पाकिस्तान जिंकला आहे, तेव्हा ते हिंदूंना काफिर म्हणून संबोधतात आणि मुस्लिम आणि ख्रिश्चनांसह संपूर्ण भारताला काफिर घोषित करण्यात येते. त्यांच्याकडून डावा करण्यात येतो कि, इस्लाम जिंकला आहे.”
हेही वाचा : ज्वाला गुट्टाकडून ३० लिटर आईचे दूध दान! माजी बॅडमिंटपटूच्या कृतीचे कारण ऐकाल तर व्हाल भावुक..
ताहिर गोरा पुढे म्हणाले की, “आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये, भारतीय संघाकडून दोन महत्त्वाच्या गोष्टी साधण्यात साधण्यात आल्या. प्रथम, त्यांनी शानदार विजय नोंदवला आणि नंतर, हस्तांदोलन करण्याचे टाळले. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला जोरदार उत्तरे दिली आहे. ते म्हणाले की असे करून भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानला एक संदेश दिला आहे की त्यांना हस्तांदोलन करून त्यांना मैत्री करायची नाही, परंतु सामना खेळावा लागला कारण बीसीसीआयला आशिया कपमध्ये पाकिस्तानसोबत स्पर्धा करायची होती.”