भारतीय संघ(फोटो-सोशल मीडिया)
IND vs UAE : आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरवात झाली आहे. काल अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात झालेल्या सामन्याने या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. या सामन्यात अफगणिस्तानने हाँगकाँगचा ९४ धावांनी दणदणीत पराभव केला आहे. आज १० सप्टेंबर रोजी स्पर्धेतील दूसरा सामना भारत आणि यूएई यांच्यात खेळला जात आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर यूएई संघ प्रथम फलंदाजीला मैदानात उतरला आहे. सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. भारतीय गोलंदाजांसमोर यूएई संघाला टिकाव धरता आला नाही, परिणामी यूएई संघ ५७ धावांवर गारद झाला आहे. भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादवने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आहेत.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय भारतीय संघाच्या गोलंदाजांनी सार्थकी ठरवला. यूएई संघ प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद ५८ धावांवर गदगडला. यूएई संघाची सुरवात चांगली होती. परंतु त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी यूएई संघाला पुन्हा सामन्यात परत येऊ दिले नाही. अलिशान शराफूने यूएईकडून सर्वाधिक २२ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार मुहम्मद वसीमने १९ ने धावा केल्या. त्यानंतर एकाही फलंदाजाला डबल आकड्यात धावा करता आलेल्या नाही. मुहम्मद जोहैब २, राहुल चोप्रा ३ , हर्षित कौशिक २, आसिफ खान २, ध्रुव पराशर १, सिमरनजीत सिंग १ , हैदर अली १, जुनैद सिद्दीकी ० धावा करून बाद झाले तर मुहम्मद रोहिद खान २ धावा करून नाबाद राहीला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ४ विकेट्स, शिवम दुबेने ३ विकेट्स तर जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
हेही वाचा : ICC T20 rankings मध्ये रवी बिश्नोईसह अर्शदीप सिंगचा जलवा! टॉप-१० मध्ये तीन भारतीय खेळाडूंनी पटकावले स्थान
ही दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन आहे
इंडिया प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
UAE प्लेइंग इलेव्हन: मुहम्मद वसीम (सी), अलिशान शराफू, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (प), आसिफ खान, हर्षित कौशिक, हैदर अली, ध्रुव पराशर, मुहम्मद रोहिद खान, जुनैद सिद्दीकी, सिमरनजीत सिंग