फोटो सौजन्य - X
आशिया कप 9 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे यामध्ये भारत आणि पाकिस्तान या संघाची लढत 14 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ अ गटामध्ये आहेत. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताचा संघ पहिल्यांदाच पाकिस्तान विरुद्ध लढणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने युएईमध्ये होणाऱ्या आगामी तिरंगी मालिका आणि आशिया कप २०२५ साठी आपला संघ जाहीर केला आहे. सलमान आगा संघाचा कर्णधार असेल, तर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनाही नवीन मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांच्या नियमानुसार या मेगा स्पर्धेसाठी दुर्लक्षित करण्यात आले आहे.
पाकिस्तान २९ ऑगस्टपासून युएई आणि अफगाणिस्तानविरुद्ध तिरंगी मालिका खेळणार आहे, त्यानंतर हे सर्व संघ ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये सहभागी होतील. पाकिस्तानच्या टी-२० संघात बाबर आणि रिझवान यांना दुर्लक्षित करण्यात आले, परंतु ज्यांना स्थान मिळाले आहे त्यात वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ तसेच फखर जमान आणि खुशदिल शाह सारखे विश्वासू खेळाडूंचा समावेश आहे.
स्टार यष्टीरक्षक मोहम्मद हरिसनेही आपले स्थान कायम ठेवले आहे. निवडकर्त्यांनी हसन नवाज, सलमान मिर्झा आणि सुफयान मोकीम सारख्या तरुण नावांवरही विश्वास व्यक्त केला आहे. बांगलादेशमध्ये प्रभावी कामगिरी केल्यानंतर ३१ वर्षीय सलमान मिर्झा यालाही संघात कायम ठेवण्यात आले आहे, जिथे त्याने तीन सामन्यात ५.२१ च्या इकॉनॉमी रेटने सात बळी घेतले होते. “बांगलादेशमधील कामगिरीमुळे आम्ही सलमान मिर्झाला संघात कायम ठेवले आहे,” असे पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी संघ घोषणेनंतर पत्रकार परिषदेत सांगितले.
🚨 NO BABAR & RIZWAN IN PAKISTAN SQUAD FOR ASIA CUP 🚨
Salman Ali (C), Abrar, Faheem, Fakhar, Rauf, Hasan Ali, Hasan Nawaz, Talat, Khushdil Shah, Haris (WK), Nawaz, Waseem Jnr, Farhan, Saim Ayub, Salman Mirza, Shaheen, Sufyan Moqim. pic.twitter.com/9jfFKEoXwk
— Johns. (@CricCrazyJohns) August 17, 2025
२०२५ च्या आशिया कपमध्ये पाकिस्तानला भारत, ओमान आणि यूएईसह ‘अ’ गटात स्थान देण्यात आले आहे. पाकिस्तान १२ सप्टेंबर रोजी ओमानविरुद्ध आपला मोहीम सुरू करेल, त्यानंतर त्यांना १४ सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध बहुप्रतिक्षित सामना खेळायचा आहे. तथापि, हा सामना होईल की नाही हे येणारा काळच सांगेल. खरं तर, पहलगाम हल्ल्यानंतर, भारत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकू शकतो.
सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन शाह आफ्रिदी आणि सुफियान.