हांगझोऊ : दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल सिंग संधू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात या भारतीय जोडीने मलेशियाच्या आयफा बिंती अजमान आणि मोहम्मद स्याफिक बिन मोहम्मद कमाल यांचा पराभव केला. 35 मिनिटे चाललेल्या या सामन्यात भारतीय जोडीने 11-10 आणि 11-10 असा सहज विजय मिळवला. टीम इंडियाचा क्रिकेटर आणि दीपिका पल्लीकलचा पती दिनेश कार्तिक या विजयाने खूप खूश आहे.
Its gold time again 😍😍😍🏅🏅🏅
Well done @DipikaPallikal and harinder
Thanks @Sundarwashi5 for the video #GOLD#AsianGames2023 #Squash pic.twitter.com/N5PRRrhW5i
— DK (@DineshKarthik) October 5, 2023
ट्विट करून पत्नीला प्रोत्साहन
कार्तिक आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या समालोचन पॅनेलचा भाग असल्यामुळे तिला पाठिंबा देण्यासाठी त्याच्या पत्नीसोबत चीनच्या हांगझोऊ येथे जाऊ शकला नाही. अशा परिस्थितीत त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करून पत्नीला प्रोत्साहन दिले.
चार आशियाई क्रीडा स्पर्धेत सहा पदके जिंकली
दीपिकाने, कदाचित शेवटच्या वेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळत असताना, तिच्या मोहिमेचा शेवट दोन पदकांसह केला. ती कांस्यपदक जिंकणाऱ्या महिला संघाचादेखील एक भाग होती. या 32 वर्षीय खेळाडूने चार आशियाई क्रीडा स्पर्धेत सहा पदके जिंकली असून त्यात एक सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे.
वॉशिंग्टन सुंदरचे खूप खूप आभार
आपल्या पत्नीच्या या कामगिरीवर दिनेश कार्तिकने ट्विट केले आणि लिहिले, ‘पुन्हा एकदा सुवर्णकाळ,’ खूप छान दीपिका आणि या व्हिडिओसाठी हरिंदर आणि वॉशिंग्टन सुंदरचे खूप खूप आभार.
भारतीय स्क्वॉशला सपोर्ट करण्यासाठी बाहेर
दुसर्या ट्विटमध्ये वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल त्रिपाठीला टॅग करत कार्तिकने लिहिले, ‘वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल त्रिपाठी तुमचे खूप खूप आभार. तुम्ही सर्वजण दीपिका आणि भारतीय स्क्वॉशला सपोर्ट करण्यासाठी बाहेर आलात हे पाहून खूप आनंद झाला. याचा अर्थ माझ्यासाठी खूप आहे. मलाही हेवा वाटतो की मी तिथे पोहोचू शकलो नाही, पण तू क्रिकेटमधून वेळ काढून स्क्वॉश पाहायला गेलास हे मला खूप आवडले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघ देखील सहभागी होत आहे. अशा परिस्थितीत संघातील खेळाडू सरावातून वेळ काढून इतर खेळांशी निगडित खेळाडूंना साथ देत आहेत. हॉकी सामन्यात भारतीय क्रिकेटपटूही उपस्थित होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेशशी उपांत्य सामना आहे. टीम इंडियाने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळचा पराभव केला होता.