फोटो सौजन्य - सोशल मिडिया BWF / BadmintonPhoto
बी डब्ल्यू एफ वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५ चे सामने सुरू आहेत. काल या स्पर्धेचे राऊंड ऑफ १६ चे सामने पार पडले. यामध्ये भारताच्या बॅडमिंटन खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली आणि तीन सामने काल वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळले या तीनही सामन्यांमध्ये भारताच्या बॅडमिंटन खेळाडूंनी विजय मिळवून उप उपांत्य फेरीमध्ये एन्ट्री केली आहे. भारताची मिक्स जोडी तनिषा क्रिस्टो आणि ध्रुव कपिला यांनी कमालीची कामगिरी करून वर्ल्ड रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर असलेले टंग आणि तसे या दोघांना पहिला राऊंड गमावल्यानंतर सलग दोन्ही राउंडमध्ये पराभूत करून उप उपांत्य फेरीतील प्रवेश केला आहे.
भारताची स्टार दिग्गज खेळाडू दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू हिने आहे आणखी एकदा तिने तिची कमाल दाखवली. पीव्ही सिंधू हिने विश्व रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेली वांग झेड आय हिला पहिल्या दोन्ही राउंडमध्ये पराभूत करून कॉटर फायनल मध्ये स्थान पक्के केले आहे. पहिल्या खेळामध्ये पी व्ही सिंधुने २१–१९ असा राऊंड जिंकला तर दुसऱ्या डावामध्ये २१–१५ असा डाव जिंकून उप उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पीव्ही सिंधू हिचे सुरुवातीपासूनच वर्चस्व पाहायला मिळाले आहे.
२८ ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये सुरू असलेल्या BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने उत्तम कामगिरी केली. पीव्ही सिंधूने चीनची जागतिक नंबर-२ खेळाडू झी यी वांग हिला सरळ सेटमध्ये पराभूत करून महिला एकेरीच्या शेवटच्या ८ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. पीव्ही सिंधूचा सामना क्वार्टरफायनलमध्ये जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वर्दानीशी होईल. इंडोनेशियन खेळाडूने या वर्षाच्या सुरुवातीला सुदिरमन कपमध्ये सिंधूचा सरळ गेममध्ये पराभव केला होता, जरी २०२२ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूने दुसऱ्या फेरीचा सामना जिंकला होता.
CAN’T BELIEVE IT STILL, IS IT REAL?????🥺
Indians won 3/3 Matches in Pre-QF against much higher ranked players at World C’ship 🔥🔥🔥 pic.twitter.com/FcYD1N7sht
— The Khel India (@TheKhelIndia) August 28, 2025
भारताची आयकॉनिक जोडी सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने भारतीय बॅडमिंटनसाठी एक नवे युग सुरू केले आहे. काल झालेल्या सामन्यामध्ये देखील त्यांनी कमाल केली. त्यांनी वर्ल्ड रँकिंग मध्ये सहाव्या स्थानावर असलेल्या जोडीला पराभूत करून उप उपांत्य फेरीमध्ये स्थान पक्के केले आहे.