फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ चा चौथा कसोटी सामना चौथ्या दिवशी अतिशय रोमांचक वळणावर आला आहे. आजपासून सामन्याच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे, यामध्ये भारताच्या गोलंदाजांनी सामन्यात कहर केला आहे. जिथे भारताने ऑस्ट्रेलियावर आपली पकड पूर्णपणे कायम ठेवली आहे. सध्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ संकट दिसत आहे. चौथ्या दिनाच्या तिसऱ्या सेशनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने ९ विकेट्स गमावले आहेत. यामध्ये आता दुसऱ्या इनिंगच्या ६५ ओव्हरनंतर २७८ धावांची आघाडी घेतली आहे. याचा दरम्यान आता ऑस्ट्रेलिया संघाच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
या कसोटी सामन्याच्या मध्यावर ऑस्ट्रेलियन संघासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिस भारताविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी आणि पुढील कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. मेलबर्न येथे सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत पर्यायी खेळाडू म्हणून मैदानात उतरताना इंग्लिसला वासराच्या स्नायूचा ताण आला, त्यामुळे तो या मालिकेतून बाहेर पडला आहे.
IND vs AUS : ऑस्ट्रेलियन मीडियाने केल्या सीमा पार, विराट कोहलीच्या वडिलांची उडवली खिल्ली
या दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियन संघासमोर नवे संकट उभे राहिले आहे. यावेळी, संघात जोश इंग्लिस हा एकमेव अतिरिक्त फलंदाज शिल्लक होता, कारण अष्टपैलू ब्यू वेबस्टरला बिग बॅश लीगमध्ये खेळण्यासाठी सोडण्यात आले होते. आता ऑस्ट्रेलियाला सिडनी येथे होणाऱ्या नवीन वर्षाच्या कसोटीसाठी संघात अतिरिक्त फलंदाज समाविष्ट करण्याचा विचार करावा लागणार आहे.
विशेष म्हणजे, जोश इंग्लिसने या कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीदरम्यान पर्थ स्कॉचर्ससाठी दोन बिग बॅश लीग सामने खेळले आणि त्यानंतर तो राष्ट्रीय संघात परतला. इंग्लिस बाहेर पडल्याने आता नॅथन मॅकस्विनीला संघात परत बोलावण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. या कसोटीपूर्वी, मॅकस्विनीला सॅम कॉन्स्टासच्या बाजूने संघातून वगळण्यात आले होते, परंतु आता त्याच्या बहु-क्षेत्रीय फलंदाजीच्या क्षमतेमुळे त्याला सिडनी कसोटीत संधी मिळू शकते.
इंग्लिस श्रीलंकेच्या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघात परत येऊ शकतो. फिरकी गोलंदाजीविरुद्धचे त्याचे कौशल्य श्रीलंकेत ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. ऑस्ट्रेलियन संघ २९ जानेवारी रोजी गॅले येथे पहिली कसोटी खेळण्यापूर्वी यूएईमध्ये प्री-टूर कॅम्प आयोजित करेल.
भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने चार विकेट्स नावावर केले आहेत तर मोहम्मद सिराजने देखील त्याची कमाल दाखवली आहे. मोहम्मद सिराजने संघासाठी दुसऱ्या इनिंगमध्ये तीन विकेट्स नावावर केले. रवींद्र जडेजाने संघासाठी १ विकेट्स घेतला आहे. दोन्ही संघासाठी चौथा आणि पाचवा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल स्थान पक्के करण्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे आता जो संघ दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवणार तो संघ फायनलमध्ये जागा पक्की करणार आहे.