सौजन्य - ICC AUS VS PAK : पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांनी गाजवले ॲडलेडचे मैदान; ऑस्ट्रेलियाची पूर्ण फलंदाजी काढली मोडीत
AUS VS PAK Match : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाच्या वेगवान गोलंदाजांनी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. ॲडलेडच्या मैदानावर आधी शाहीन शाह आफ्रिदीने ऑस्ट्रेलियाला जबरदस्त धक्का दिला आणि त्यानंतर हॅरिस रौफने आपल्या वेगानं मधली फळी उद्ध्वस्त केली. नसीम शाह आणि हुसनैन यांनीही दोन्ही गोलंदाजांना चांगली साथ दिली आणि ऑस्ट्रेलियाचा पूर्ण डाव 163 धावांत गुंडाळला गेला.
हरीस रौफचा खौफ, गाजवले अॅडलेडचे मैदान
Haris Rauf led the charge with a sensational five-wicket haul as Pakistan hold Australia back in Adelaide 💥
📝 #AUSvPAK: https://t.co/pRvFm58GSt pic.twitter.com/PUS5y7u72a
— ICC (@ICC) November 8, 2024
ॲडलेडच्या मैदानावर कांगारूंचा धुव्वा
पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी आज ॲडलेडच्या मैदानावर कांगारूंचा धुव्वा उडवला. अवघ्या 163 धावांवर संपूर्ण संघाला गुंडाळण्यात पाकिस्तानी गोलंदाजांना यश आले. यामध्ये हरीस रौफ, शाहिन अफ्रिदी आणि नसीम शाहने भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी उद्ध्वस्त केली.
ॲडलेडच्या मैदानावर पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. त्यामुळे मालिकेत आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला दुसऱ्या वनडेत सुरुवातीपासूनच बॅकफूटवर राहावे लागले. आज पाकिस्तान 4 वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला आणि प्रत्येक गोलंदाजाने सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाला खिळखिळीत ठेवण्याचा निर्णय घेतला.
रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
ॲडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग 11 मध्ये शॉन ॲबॉटच्या जागी जोश हेझलवूडला संधी मिळाली. पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर नसीम शाहला पहिल्या वनडेत क्रॅम्प्समुळे मैदान सोडावे लागले होते, तो आपली जागा वाचवण्यात यशस्वी ठरला. पाकिस्तानचे इरादे अगदी स्पष्ट होते, त्यांना ऑस्ट्रेलियाला वेगवान आव्हान द्यायचे होते, त्यात त्यांना सुरुवातीपासूनच यश आले.
पाकच्या वेगवान गोलंदाजांचा पराक्रम
ॲडलेडच्या खेळपट्टीवर गवत आणि उसळी होती ज्यामुळे कोणत्याही वेगवान गोलंदाजाच्या तोंडाला पाणी सुटते, मग शाहीन शाह, हॅरिस रौफ, नसीम शाह आणि हसनैन स्वतःला कसे रोखू शकतील. शाहीनने तिसऱ्या षटकात मॅकगर्क आणि सातव्या षटकात शॉर्टला बाद करून ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब केली. खराब सुरुवातीचा फायदा घेत हॅरिस रौफने ऑस्ट्रेलियाला सावरू दिले नाही. रौफने अप्रतिम गोलंदाजी करत 4 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि ऑस्ट्रेलियाला कोणतीही मोठी धावसंख्या उभारता येणार नाही याची काळजी घेतली. रौफने एकूण पाच विकेट घेतल्या. रौफच्या चेंडूंमध्ये अप्रतिम उसळी होती जी एकाही कांगारू फलंदाजाला जमली नाही.
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी विस्कळीत
मेलबर्ननंतर आता ॲडलेडमध्येही कांगारूंच्या फलंदाजांना पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांसाठी कोणतीही योजना नव्हती. अनुभवी स्टीव्ह स्मिथ वगळता सर्व फलंदाज उसळी आणि वेगवान खेळापुढे हतबल दिसत होते. परिस्थिती अशी होती की बहुतेक फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला पण त्याचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. स्मिथने सर्वाधिक 35 धावा केल्या. विश्वचषकाचा नायक मॅक्सवेलही काही विशेष करू शकला नाही, अशीच अवस्था सर्व फलंदाजांची होती. परिणामी ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ 163 धावांवर आटोपला. विशेष म्हणजे यजमान संघाचा पराभव करण्यासाठी पाकिस्तानच्या गोलंदाजांनी केवळ 35 षटके घेतली.